पत्रकार साहेबराव राऊत यांच्या वडिलांच्या निधनानंतर घरची भेट; कुटुंबियांची मन:पूर्वक विचारपूस..
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
अंजनगाव बारी येथील ज्येष्ठ पत्रकार साहेबराव राऊत यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन व्यक्त करण्यासाठी बळवंत वानखडे यांनी भेट दिली. त्यांच्या या अकस्मित भेटीमुळे गावात व पत्रकारितेच्या क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.खासदार बळवंत वानखडे यांनी राऊत कुटुंबाची सविस्तर विचारपूस करत त्यांना धीर दिला. “आई–वडिलांचे संस्कार हे अमूल्य आहेत. त्यांच्या आठवणी व मार्गदर्शनावर स्थिर राहून पुढे जाण्याची शक्ती मिळो,” अशा शब्दांत त्यांनी कुटुंबाला सांत्वन केले. त्यांनी दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली वाहत कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले दिले.

या भेटीदरम्यान परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पत्रकार साहेबराव राऊत, माजी सरपंच प्रकाश खंडार, जेष्ठ नागरिक वसंतराव सोनार, देवेंद्र कदम, समाजसेवक गिरीश चौधरी, संघपाल सरदार, टिळकराम हटवार, मनिष कदम, राजू गरूड, राजेश श्रीखंडे तसेच इतर अनेक नागरिक व स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.या संवेदनादायी भेटीमुळे परिसरात खासदार बळवंत वानखडे यांच्या सामाजिक बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
