14 जून वाढदिवसानिमित्त विशेष लेख
कोणत्या व्यक्तीने कोठे जन्म घ्यावा हे त्या व्यक्तींच्या हातात नसते. परंतु झालेला जन्म समाजाच्या व देशाच्या हिसाठीसार्थक करणे हे त्या व्यक्तीच्या हातात असते. असेच एक विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविणारे एक व्यक्तिमत्व अमरावतीचेभूषण म्हणजे डॉ.मनिष शंकरराव गवई, यांचा जन्म 14 जून 1979 रोजी अचलपूर येथे झाला.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तत्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणाराअमरावतीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवणाऱ्या ध्येयवेडा तरुणाचा एक संघर्षमय प्रवासवर प्रकाश टाकणारा हा लेख.प्रत्येक आई वडीलांना वाटते की, आपला मुलगा मोठा व्हावा त्याने चांगले शिक्षण घेऊन नाव कमवावे त्याकरीता त्यांचेकुटूंब अमरावतीला आले. अमरावतीला आल्यानंतर विलास नगर येथे अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत होते. विलासनगरात राहत असुन सुध्दा त्यांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार केले त्यांना योग्य शिक्षण देण्याकरीता ज्ञानमाता हायस्कुलमध्ये प्रवेश देण्यात आला. शालांत परीक्षेपर्यंतचे शिक्षण ज्ञानमाता हायस्कुलमध्ये झाले. त्यानंतर पुढील शिक्षण विदर्भमहाविद्यालय व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,शिक्षण हे वाघिणीचे दूधआहे. तो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्या सारखा राहणार नाहीडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश घेऊन डॉ.मनीष गवई यांनी आपली पुढील वाटचाल सुरु ठेवली. ती वाटचाल अखंडपणे सुरु आहे. बालपणापासुन त्यांना समाजसेवा करण्याची आवड होती. लहानपणापासुन आपल्याकडे जी साधने उपलब्ध आहे जसे पाटी, पुस्तक असेल पेन असेल किंवा आणखी काही मदत असेल ते गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना देण्याची वृत्ती त्यांच्या अंगी होती, असे त्यांच्या आई शोभासांगतात. उन्हाळयाच्या सुट्यांमध्ये झोपडपट्टी भागामध्ये अनेक बालसंस्कार शिबिर घेऊन अनेक विद्यार्थी घडले.. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील तळागाळातील माणसापर्यंत पोहचले पाहिजे.त्याकरीता डॉ.मनिष गवई यांची सतत धडपड आहे. त्यासाठी त्यांनी मी आंबेडकर बोलतोयहा एकपात्री प्रयोग सुरु केला,त्यांच्या या एकपात्री नाट्याचे प्रयोग शेकडोंच्या वर सर्वदूर परसले. त्यांनी विविध क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांना भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त झाला. एवढेच नव्हेतर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय युवा शिष्ट मंडळात डॉ.मनिष गवई यांचा समावेश करुन गौरव केला. तसेच नेपाळ, चीन,इत्यादी देशांमध्ये डॉ.मनीष गवई यांनी भारत देशाचे प्रतिनिधीत्व केले. डॉ.मनीष गवई जेथे जातील तेथे आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवितात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये सिनेट सदस्य म्हणून उत्कृष्ट कार्य केले. अमरावती विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिनेट सभेत डॉ.मनीष गवई यानी सर्वाधिक विद्यार्थी हिताचे सर्वात जास्त प्रश्न ,प्रस्ताव मांडले व विद्यार्थी हितासाठी सिनेट सभेत आक्रमक झाले. याशिवाय ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून देखील कार्य केले आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामगिरी पाहून उत्तर प्रदेशच्या राज्यपालांची त्यांची सुभारती विद्यापीठात राज्यपाल नामित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे.परंतु माहितीच्या युगामध्ये सध्या युवा वर्ग आपल्या ध्येयापासुन दूर जात आहे.युवावर्ग व्यसनाधीन होत आहे. युवा वर्गाने व्यसनापासून दुर राहून आपल्या राष्ट्राचे हीत कशात आहे याचा विचार करुन सर्वांगिण सुंदर भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. अमरावती येथील डॉ.मनीष गवई सारखा युवक आपल्या स्वत:च्या प्रयत्नाने जगामध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करतो. हे अमरावतीच नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयात त्यांनी महत्त्वपूर्ण पदावर काम केले. इंडियन वर्चूअल विद्यापीठाची सामाजिक तथा युवक कल्याण क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी मानद डॉक्टरेट मनीष गवई यांना प्राप्त झाली असून डिलिट सारखी मनाची पदवी देशील त्यांना प्राप्त झाली आहे. याशिवाय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने देखील आचार्य पदवी देऊन सन्मानित केले आहे नुकतेच त्यांची क्रीडा व युवक सेवा मंत्रालयाच्या अधीन हिंदुस्थान स्काऊट गाईडच्या निवासी आयुक्त पदी निवास झाली युवक कल्याण क्षेत्रात डॉ.गवई यानी समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. युवकांना सशक्त करण्यासाठी केंद्र शासनाने युवा धोरण जाहीर केले असून याकेंद्र शासनाच्या धोरणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मनीष गवई यानी युवकांना जागृत करण्याचे काम मनीष गवई गेल्या १५ ते 20 वर्षपासून करीत आहेत अंतर्राष्ट्रीय पातळवर देखील या विषयाला घेऊन ते चीन, नेपाळ,थायलंड, भूटान सह सार्क देशात सादरीकरण केले असून त्यानी राष्ट्र बांधनीत युवकाचा सहभाग, युवा विचार आदान प्रदान,युवा मैत्री यावर प्रकाश टाकला आहे. तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका यावर सार्क देशात बाजू मांडली आहे. युवकांना जागृत करण्यासाठी त्यानी अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. सार्क देशात युवकांशी त्यानी सवाद साधला व मैत्रीचासदेश दिला आहे. डॉ.मनीष गवई यांच्या मध्यमातुन अमरावतीच्या मातीला देशाच्या युवकांचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.विशेष बाब म्हणजे त्याना भारत- नेपाळ युवा मैत्री पुरस्कार, इण्डिया रशिया यूथ आयकोन अवार्डने,इंटरनॅशनल युथ अवार्डने, देखील सन्मानित करण्यात आले आहे.डॉ मनीषला मी लहानपणा पासून पाहतो आहे तो सतत समाज कार्यात स्वतःला वाहून घेतो त्यासाठीच त्याला देशातील अभिमानाचा पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय युवा पुरस्कार देखील प्राप्त झाला. आई वडिलांच्या निधनानंतर त्यांनी स्वतःला सावरले आणि पुन्हा जोमाने आपले सामाजिक कार्य सुरु ठेवले. त्यांचा हा जीवन संघर्षाचा प्रवास आम्ही जवळून पाऊल आहे. त्यांचा अमरावती ते दिल्लीचा प्रवास सुद्धा कठीण राहुल आहे. मा. ना रामदासआठवले साहेबांसोबत कार्य करताना त्यांनी समाजाच्या हितासाठी सतत पुढाकार घेतलेला आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो व आणखी देश सेवा त्यांच्या हाताने घडो, अमरावतीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवणाऱ्या डॉ मनीष गवई याना त्यांच्या वाढदिवसीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
राजाभाऊ गडलिंग (जेष्ठ पत्रकार)
समाज भूषण पुरस्कार प्राप्त अमरावती ९८६०४४२६८२
