प्रा. डॉ. क्षितिज शहा अध्यक्ष तर तेजस पाठक महानगर मंत्री
अमरावती /उत्तम ब्राम्हणवाडे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमरावती महानगराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये पुनर्निर्वाचित अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. क्षितिज शहा तर नवनिर्वाचित महानगर मंत्री म्हणून तेजस राजेश पाठक यांची घोषणा करण्यात आली.
महानगर उपाध्यक्षपदी प्रा. अनुप मडगे, प्रा. अविनाश मेटकर व प्रा. सुनील बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महानगर सहमंत्री म्हणून निकेत कलाने, आर्यन ठाकरे, सृष्टी महाजन व यश आलोने यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.कार्यालय मंत्री म्हणून सुरज वर्मा, कार्यक्रम व्यवस्था प्रमुख म्हणून उमेश नारकोल, कोष व व्यवस्था प्रमुख म्हणून संजय गुमळे तर सोशल मीडिया संयोजक म्हणून जय गिरनाळे यांची नियुक्ती करण्यात आली.विविध विद्यार्थी आयामांच्या प्रमुख व संयोजकांचीही नियुक्ती करण्यात आली. यामध्ये SFS प्रमुख शुभम कदम, SFS संयोजक देव करंजकर, SFD प्रमुख आनंद बक्षी, SFD संयोजक गोविंद मेटे, खेलो भारत संयोजक राहुल वानखडे, राष्ट्रीय कला मंच प्रमुख अंकुश गिरी, राष्ट्रीय कला मंच संयोजक मनस्वी तायडे, मेडीव्हिजन संयोजक प्रेम कावलकर, फार्मव्हिजन संयोजक वेद व्यास, TSVK संयोजक प्रज्वल टापरे, अॅग्रीव्हिजन संयोजक संस्कार मोगल, जिज्ञासा संयोजक जतिन मालविया, विधीकार्य संयोजक गणेश ठाकरे व साविष्कार संयोजक अनिश बोदडे यांचा समावेश आहे.तसेच विद्यापीठ प्रमुख देव गणोजे, वस्तीगृह संयोजक श्रावणी गोबरे, समाजकार्य विद्यार्थी कार्य प्रमुख युवराज कोळसकर यांच्यावरही जबाबदारी सोपविण्यात आली.महानगर कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रांत सहमंत्री रिदम शहा, तृष्णा चव्हाण, श्रुती कोर्टेकर, गौरी भारती व शिवानी भंडारकर यांचा समावेश करण्यात आला. तसेच अमरावती विभाग संयोजक रिद्धेश देशमुख, विभाग संघटन मंत्री योगेश शेळके आणि अमरावती महानगर विस्तारिका भूमिका गेडाम यांचाही कार्यकारिणीत समावेश करण्यात आला.नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून अमरावती महानगरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडत विद्यार्थी हित, राष्ट्रहित आणि समाजहितासाठी विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
