जोरदार वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; पुढील २४ तासांसाठी तीव्र उष्णतेचा अलर्!
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
आज जिल्ह्यासह अंजनगाव बारी परिसरात दुपारी साडेतीन ते सुमारे चार वाजताच्या दरम्यान अचानक हवामानात बदल झाला आणि जोरदार वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला.वादळी वाऱ्याचा तडाखा इतका तीव्र होता की कोंडेश्वर मार्गावरील मुख्य लाईनवर तांत्रिक बिघाड निर्माण होऊन विजेचा पुरवठा पूर्णतः खंडित झाला.महावितरणने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरवठा जाणीवपूर्वक बंद केला असून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू असल्याची माहिती दिली.वादळामुळे झाडांची पडझड, वाकलेले खांब, सैल झालेल्या तारा अशी परिस्थिती निर्माण झाली असून महावितरणने नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.दुरुस्ती पूर्ण झाल्यावरच विजपुरवठा पूर्ववत केला जाईल, असा संदेशही देण्यात आला आहे.अचानक आलेल्या पावसाने उकाड्यात होरपळलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांच्या उकरड्या झालेल्या पिकांना या पावसामुळे चांगली बेहिल मिळाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहेत.

पुढील २४ तासांसाठी तीव्र उष्णतेचा अलर्टही जाहीर
India Meteorological Department (IMD) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत अनेक जिल्ह्यांत तीव्र उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची शक्यता आहे. अमरावती,चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर,वर्धा याशिवाय काही ठिकाणी रात्रही उष्ण राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.या संदर्भातील सूचना मंत्रालय, मुंबई येथे जारी करण्यात आल्या असून नागरिकांच्या मोबाईलवर उष्णतेचे व पावसाचे अलर्ट संदेश देण्यात आले आहेत.
तत्पुवी नागरिकांना महत्त्वाची सूचना
•विजपुरवठा दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत संयम ठेवावा
•पडलेली झाडे, तारा, विद्युत खांबांच्या आसपास जाणे टाळावे
•तीव्र उकाड्यामुळे गरजेपुरतेच बाहेर पडावे
•पुरेसे पाणी पिणे, टोपी/छत्रीचा वापर करणे, वृद्ध व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.
