नगरसेवक वासुदेव लोखंडे याचा पुढाकार; मेळाव्याचे झाले उद्घाटन
प्रभाग क्रमांक १ मधील ७० अतिक्रमण धारक होणार नियमानुकुल.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने सन २०११ पूर्वीच्या भोगवटा धारक आणि अतिक्रमण धारक याना नियमानुकुल करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने नांदगाव खंडेश्वर येथील नगर पंचायतीच्या क्षेत्रातील भोगवटा धारक नागरिकांना नियमानुकुल करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या मेळाव्याचे आयोजन नांदगाव खंडेश्वर येथील प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती वासुदेव लोखंडे यांच्या पुढाकाराने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर मेळावा नांदगाव खंडेश्वर येथील पाच प्रभागामध्ये मेळावा आयोजित करण्यात येणार असून येथील भोगवटा धारक याना नियमानुकुल करण्यात येणार आहे.या मेळाव्याचे उद्घाटन नगर पंचायतीचे मुख्याधिकारी निवृती भालकर यांचे हस्ते आणि नगराध्यक्ष सौ.प्राप्ती मारोटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या मेळाव्याला नगरसेवक सौ. प्रीती इखार, वासुदेव लोखंडे, मो.साजिद, प्रकाश मारोतकर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक ओंकार ठाकरे,शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद कोहळे यावेळी उपस्थित होते.सर्व मान्यवराचा यावेळी नगरसेवक वासुदेव लोखंडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या मेळाव्यात प्रभाग क्रमांक एक मधील एकूण ७० भोगवटा धारक नागरिकांना नियमानुकुल करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या मेळाव्याचे प्रास्ताविक ओंकार ठाकरे, संचालन रूपेश बेहरे,आभार प्रदर्शन सौ.मेघा बनकर यांनी केले.या मेळाव्यात नगर पंचायत अधिकारी राहील अहेमद,विकास सपकाळ,संजय अघव,राहुल सावळे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.मेळाव्याच्या यशस्वितेकरिता निलेश इखार,रवी ठाकूर, गोपाल बनकर,सौ.सविता बनकर, सौ.प्रतीक्षा राऊत, सौ.नीलिमा भोयर, सौ.सुनीता वैश्य, सौ.जयश्री सुहागपुरे, प्रकाश ब्राह्मणवाडे, मनोज खेडकर, प्रशांत हुकरे, हरीश पोहनकर, विक्की धांडे,महेश खूडे, गजानन मडके, सौ.सोनू भोयर, आकाश मगर, प्रविण भोयर, उज्वल मडके, सौ.राणी मडके, सौ.मयुरी वैश्य, सौ. पूजा खेडकर आदींनी परिश्रम घेतले.
