शिंदी येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नूतन कार्यकारिणी जाहीर
अचलपूर/ तालुका प्रतिनिधी
अचलपूर तालुक्यातील शिंदी येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नूतन शाखा कार्यकारिणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली. समाज संघटन अधिक मजबूत करणे, युवकांना संघटित करणे तसेच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर कोथळकर, तालुका अध्यक्ष राम लाहाळके, तालुका सचिव सुरेश काकडे, तालुका उपाध्यक्ष किशोर पाचखंडे, ज्येष्ठ मार्गदर्शक मनोहर वानरे,सामाजिक कार्यकर्ते साहेबराव शिवणकर,नरेंद्र इंगळे आदी उपस्थित होते.शिंदी शाखा अध्यक्षपदी मधुकर गुलाब इंगळे, उपाध्यक्षपदी विठ्ठल पखाले, सचिवपदी अतुल चिमणकर यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून श्रीरामजी मालखेडे, देवीदास रेवसकर, गणेश इंगळे, मनोहर इंगळे, रामेश्वर इंगळे व संजय इंगळे यांची निवड करण्यात आली.

युवा आघाडीच्या अध्यक्षपदी अविनाश विजय इंगळे, उपाध्यक्ष कार्तिक मनोहर इंगळे, सचिव कुणाल अमोल चिमणकर, कोषाध्यक्ष रोषन विठ्ठल पखाले, सहसचिव प्रमेय गणेश इंगळे, कार्याध्यक्ष अनुज मनोहर इंगळे, सह-कोषाध्यक्ष आशिष मधुकर इंगळे व सदस्य अमोल लक्ष्मण चिमणकर यांची नियुक्ती करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. समाजातील युवक व महिलांना संघटनेच्या माध्यमातून जोडून सामाजिक, शैक्षणिक व समाजहिताचे उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
