मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
लहान मुलांना भाज्या व फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, याविषयी डॉक्टर नेहमीच सांगतात. मात्र,बाजारात उपलब्ध असणाऱ्या भाज्या,फळांमध्ये व त्यांच्या घटकामध्ये पोषण मूल्य किती हा प्रश्न आता उदभवत आहे.भाज्या विविध चवदार रसाळफळे आपल्या दैनंदिन आहारात सकस मानली जातात.परंतु या फळासोबत दररोज घातक रसायने पोटात जात असल्याने नागरिकांना गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक आहे.बाजारात विकण्यासाठी फळे ही बागेतून,शेतातून शहरात आणावी लागतात. तसेच मार्केटमध्ये साठवून ठेवावी लागतात. या काळात फळे ताजेतवानी राहावी व टिकावी, त्याचे आयुष्य वाढावे, ती फळे खराब होवू नयेत, यासाठी डीडीटी इथरेल आणि जिन्नालिकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. घातक रसायनांचा वारेमाप वापर करून ती कृत्रिमरित्या पिकविल्या जातात. त्यानंतर मगच विकली जात असतात. तसेच फळे टिकविणे आणि पिकविण्यासाठी वापरलेल्या घातक रसायनामुळे त्वचेचे विकार उदभवतात. डायबेटीस, पिसीओडी विकार होण्याचा धोका वाढतो. सध्या बाजारात अनेक फळांचा सिझन नाही, तरीही ती फळे बाजारपेठेत उपलब्ध आहेत.कारण अनेक महिने ठेवलेली फळे आता विक्रीसाठी बाहेर काढण्यात आली आहे. अर्थातच अधिक काळ टिकावी, यासाठी फळांचे लसीकरण होते. द्राक्षावर डायक्लोवास-२६ हे रसायने वापरतात तसेच ती टिकून राहावी, यासाठी डीडीटीचा सर्रासपणे बेमालूमपणे वापर केला जातो.

अधिक कीटकनाशकांचा वापर
३० टक्क्यांपेक्षा अधिक किटकनाशके बाजारात विकल्या जाणाऱ्या फळामध्ये अधिक प्रमाणात किटकनाशके मारले जातात. एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जादा प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करणे म्हणजे मोठ्या आजारांना निमंत्रण देणारे ठरणार आहेत. त्यामुळे रासायनिक भाज्या व फळे यांच्या पेक्षा जैविक, सेंद्रिय, फळे, भाज्या खाणे केव्हाही चांगले आहेत, असे आरोग्य तज्ञ सांगतात.रासायनिक फळे व भाज्या सेवन केल्याने लहान वयातच मुलांना डोळ्यांना चष्मा लागतो. दैनंदिन जीवनात एकाग्रहता कमी होवून, सातत्य नसल्याने सतत तणाव जाणवणे, त्याचबरोबर भूक न लागणे, अस्थमा, कॅन्सर व त्वचेचे विविध रोग होण्याची भिती असते. आंबा, सफरचंद, द्राक्षे, गाजर, केळी या फळामध्ये घातक रसायनांची मात्रा असते. नागरिकांनी आपल्या अनमोल आरोग्याप्रती सावधान व सजग राहिले पाहिजे. जिभेच्या चोचल्यापेक्षा, आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष पुरविले पाहिजे.असे जाणकारांचे मत आहे.सध्या धावपळीच्या युगात नागरिकांना आपल्या आरोग्याकडे पाहिजे तेवढ्या प्रमाणात लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाहीत. परंतु, आपले आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्या दैनिक दिनचर्येत आमूलाग्र बदल करणे काळाची गरज आहेत. त्यामुळे लोकांनी व्यायाम, करणे, मार्निंग वॉकला जाणे, निसर्गाच्या सानिध्यात जाणे, याकडे विशेष लक्ष पुरविणे आवश्यक आहेत. फॉस्टफूडचे सेवन न करता घरगुती जेवनाकडे लक्ष द्यावे. सेंद्रिय भाज्या व फळे सेवनाकडे कटाक्षाने लक्ष पुरवावे. अशी मागणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
