नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूर गावातून वाहणाऱ्या बेंबळा नदी पात्रात साचलेला कचरा साफ करण्यासाठी आज श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पहूर येथील विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी नदी पात्रात उतरून प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, काच आणि इतर घनकचरा बाहेर काढला.यावेळी गावातील नागरिकांनी सांगितले की, नदीत कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली होती. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन नदी स्वच्छ केल्याने समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. स्वच्छतेतून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

या अभियानामुळे नदीचा काही भाग स्वच्छ झाला असून पाण्याचा प्रवाह मोकळा झाला आहे, विद्यार्थी मध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्याचे आयोजकांनी सागितले उपस्थित सामाजिक कार्यकर्ते, अभी ठाकरे, संकेत ठाकरे, वेदांत गावंडे, यश मारब्दे, करण शेंडे, राहुल मारोटकर, व गावातील नागरिक शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
