श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा अभिनव उपक्रम
अमरावती/ उत्तम ब्राम्हणवाडे
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (कुस्ती विभाग ) व अमरावती शहर जिल्हा कुस्ती संघ यांच्या संयुक्त विधानाने श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृह मधे प्रा डॉ संजय तिरथकर ( विदर्भ केसरी) तथा स्वीकृत नगरसेवक मनपा अमरावती यांच्या पुढाकाराने 35 वर्षा पासून गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येते आखाडा ची ही परम्परा महाराष्ट्र तथा देशात प्राचीन काळा पासून परंपरा सुरू आहे. या वर्षी 100 ज्येष्ठ पहिलवान यांनी आपल्या आयुष्याचे अनेक वर्ष कुस्ती विकासासाठी दिली व अमरावती शहराचे नाव लवकिक केले अश्या ज्येष्ठ पहेवांनाचे शाल,श्रीफळ तथा गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला .सर्व प्रथम दीप प्रज्वलन ज्येष्ठ पहिलवान शरद दातेराव, प्रभाकरराव थोरात, डॉ श्रीकांत चेंडकें, प्राचार्य श्री निवास देशपांडे,हाजी रामूशेठ,श्री भास्कर टोंमपे यांच्या हस्ते व मारुतीराया व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळचे आद्य संस्थापक गुरुवर्य स्व अंबादास पंत वैद्य यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. कार्यक्रम चे प्रास्ताविक प्रा डॉ संजय तिरथकर यांनी केले.
सर्वप्रथम ज्येष्ठ पहिलवान यांचा वतीने पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना शाल श्री फळ बुके देऊन सत्कार करण्यात आला. वैद्य साहेब यांनी सभागृहात मार्गदर्शन केले तसेच अनेक मान्यवराचे भाषण झाली. तसेच सुनील खराट् ,दिलीप तांबरे, ठाणेदार रवी राजुरवार , पी एस ई जावेद, नगर सेवक हमीद खान, यांचे उत्कृष्ट कामगिरी, तसेच नियुक्ती बद्दल सत्कार करण्यात आले तसेच प्राविण्य प्राप्त कुस्तीगीर यांचे सत्कार करण्यात आले.

ज्येष्ठ पहिलवान गजानन गरत, टेकराज धोटे,किसान पिकले, राजु धोटे,सुधीर पांडे, जितेंद्र थोरात,अतुल तीरथकर, सतीश येवले,सागर इंगोले,असे अनेक पहेलवान उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्या करिता प्रशांत अडसड, मनोहर डोळस,दिलीप इटनकर,राजू चांदोळे, रुपेश तीरथकर,समीर देशमुख, राहुल बागळे, जितेंद्र भुयार, इरफान खान, यांनी अथक परिश्रम केले.

