वीजबिलवाढीच्या भीतीने नागरिक चिंतेत
नांदगांव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
सध्या महावितरणकडून नांदगांव खंडेश्वर तालुक्यात सर्वत्र स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया युद्धस्तरावर सुरु आहे. मात्र या स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात वाढ होण्याची भीती, प्रीपेड पद्धतीची शक्यता , तांत्रिक बिघाड शक्यता नाकारता येत नाही. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची नोंद डिजिटल पद्धतीने होत असली, तरी प्रत्यक्षत ग्राहकांना त्याचा कीतपत फायदा होणार, हा प्रश्न याठिकाणी यनिमित्ताने उपस्थित होऊ शकतो.
नवीन स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलात वाढ झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार.? तसेच मीटरच्या अचूकतेबाबत शंका निर्माण झाल्यास ग्राहकांना न्याय कसा मिळणार, याबाबत महावितरणने स्पष्ट भूमिका मांडण्याची याबाबत जनजागृती मेळावे घेणे , गावनिहाय माहिती पत्रक पोहचविण्याची भूमिका घेतली पाहिजे.प्रीपेड मीटरच्या माध्यमातून मोबाईल प्रमाणे अगोदर पैसे भरून वीज वापरण्याची पद्धत लागू झाल्यास आर्थिकदृष्टीने दुर्बल व सर्व सामान्य ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. विशेषत: वेळेवर रिचार्जे करणे शक्य न झाल्यास वीजपुरवठा खंडित होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. तसेच स्मार्ट मीटर मधील तांत्रिक बिघाड , नेटवर्कची समस्या आणि चुकीच्या रिडींगमुळे ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागू शकते.वीज ही आजच्या काळातील अत्यावशक गरज असून, स्मार्ट मीटर बसविन्याच्या प्रक्रियेत ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे.ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविण्याची घाई करू नये, अशी हाक नागरिकांकडून पुढे येत आहे.स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये. तसेच ग्रहकांच्या शंकांचे निरसन होईपर्यंत महावितरणने जनजागृती आणि संवादावर भर द्यावा असे मत नांदगांव खंडेश्वर तालुका दक्षता समिती विरोधी पक्ष सदस्य मनोज गावंडे यांनी मत व्यक्त केले.
