शिवसेना उबाठा व भा क पा कार्यकर्त्यांनी दिले निवेदन.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
मंगरूळ चव्हाळा परिसरामध्ये दिनांक 30 जुलै 2026 ला झालेल्या अतिवृष्टी व आलेल्या पुरामुळे अनेक घरामध्ये पाणी गेल्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.आलेल्या पुरामुळे शेतीचे साहित्य मोटार,स्पीकलर पाईप, वाहुन गेले शेतीच प्रचंड नुकसान झाले,शेती खरडून गेली .शासनाने पंचनामे करून आजपर्यंत कोणतेही आर्थिक मदत मिळाली नाही .शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी दिनांक 21 सप्टेंबर 2026 ला तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.
निवेदन देते वेळी शिवसेना उबाठा नेते बाळासाहेब राणे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव संतोष सुरजुसे,शिवसेना उबाठा शाखा प्रमुख जगदीश कलाने, किसान सभेचे वासुदेव चौधरी, पंकज पिंपळकर, दिवाकर कुटे, गजानन गंधे उपस्थित होते.
