मोरेश्वर दिवटे यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नादगाव खंडेश्वर येथील शेतकऱ्यांना खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी प्रत्येकी १५,००० रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. मात्र, या निधीत नेमके कोणती कामे करावीत, कोणत्या प्रकारचे बांधकाम करावे आणि कोणते साहित्य वापरावे याबाबत स्पष्ट मार्गदर्शन उपलब्ध नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर दिवटे यांनी तहसीलदार कार्यालयाकडे लेखी मार्गदर्शन देण्याची विनंती केली आहे.
मोरेश्वर दिवटे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे कि, खचलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य कोणते, ते किती प्रमाणात (नग/युनिट) खरेदी करावे आणि त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, याबाबत सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. तसेच विहिरीतील गाळ काढण्यासाठी किती निधी खर्च करावा आणि बांधकामासाठी किती रक्कम वापरावी, याचेही स्पष्ट मार्गदर्शन मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तहसीलदार तसेच संबंधित शाखा अभियंता यांच्या मार्फत नियमानुसार लेखी मार्गदर्शन मिळाल्यास निधीचा योग्य वापर करून काम वेळेत पूर्ण करणे शक्य होईल.त्यामुळे प्रशासनाने तातडीने याबाबत स्पष्ट सूचना देण्याची गरज असल्याचे सुद्धा मोरेश्वर दिवटे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये म्हटले आहे.नादगाव खंडेश्वर येथील शेतकऱ्यांना खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी प्रत्येकी १५,००० रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. मात्र, या निधीत नेमके कोणती कामे करावीत, कोणत्या प्रकारचे बांधकाम करावे आणि कोणते साहित्य वापरावे याबाबत स्पष्ट मार्गदर्शन उपलब्ध नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर दिवटे यांनी तहसीलदार कार्यालयाकडे लेखी मार्गदर्शन देण्याची विनंती केली आहे.मोरेश्वर दिवटे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे कि, खचलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य कोणते, ते किती प्रमाणात (नग/युनिट) खरेदी करावे आणि त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, याबाबत सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. तसेच विहिरीतील गाळ काढण्यासाठी किती निधी खर्च करावा आणि बांधकामासाठी किती रक्कम वापरावी,याचेही स्पष्ट मार्गदर्शन मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तहसीलदार तसेच संबंधित शाखा अभियंता यांच्या मार्फत नियमानुसार लेखी मार्गदर्शन मिळाल्यास निधीचा योग्य वापर करून काम वेळेत पूर्ण करणे शक्य होईल.त्यामुळे प्रशासनाने तातडीने याबाबत स्पष्ट सूचना देण्याची गरज असल्याचे सुद्धा मोरेश्वर दिवटे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये म्हटले आहे.
