“नवी आशा, नवी दिशा” सामाजिक ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने आज सायंकाळी भव्य स्वागत
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त श्री संत गुलाबराव महाराज संस्थान, चांदूर बाजार ते पंढरपूर या पायदळ वारी पालखी सोहळ्याचे जन्ममुमी लोणी ( टाकळी) येथे उद्या दि. 24 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य स्वागत करण्यात येणार आहे. “नवी आशा, नवी दिशा” सामाजिक ग्रुप तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशनजवळ आयोजित कार्यक्रमात वारकऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार असून भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडणार आहेत. “एक हात मदतीचा” या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत असलेल्या “नवी आशा, नवी दिशा” सामाजिक ग्रुपतर्फे भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.पालखी आगमनामुळे लोणी टाकळी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी संप्रदायाची परंपरा आणि श्रद्धेचा संगम अनुभवायला मिळणार आहे.
