नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
मंदिर संस्कृतीचे रक्षण व संवर्धन, देवस्थानांच्या जमिनींचे संरक्षण, पारदर्शक प्रशासन आणि मंदिर संघटन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र देवस्थान समिती अमरावती जिल्ह्याच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथे तालुका मंदिर विश्वस्त बैठक उत्साहात पार पडली.
श्री खंडेश्वर देवस्थान, नांदगाव खंडेश्वर येथे झालेल्या या बैठकीस नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बहुतांश मंदिरांचे विश्वस्त, पदाधिकारी, पुजारी, सेवेकरी व धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत देवस्थान इनाम जमिनींचे संरक्षण, महसूल नोंदी, मंदिरांच्या कायदेशीर समस्या, मंदिर विकासकामांमध्ये मंदिर संस्थांचा सहभाग, धर्मदाय आयुक्त कार्यालयाशी समन्वय, पारदर्शक मंदिर प्रशासन तसेच जिल्हास्तरीय मंदिर संघटन मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र देवस्थान समितीचे व श्री नागेश्वर महादेव संस्थान धामंत्रीचे अध्यक्ष कैलास पनपालीया, महाराष्ट्र देवस्थान समितीचे निलेश टवलारे, वर्धा जिल्हा समन्वयक धनराज वेलणकर, जगद्गुरु राजेश्वर माऊलीचे विश्वस्त श्रीकृष्ण माहोरे, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव खंडेश्वरचे सभापती डॉ. राजेंद्र पांडे यांनी मार्गदर्शन केले, तसेच एकपाळा येथील प्रशांत महाराज काकडे यांनी सुद्धा संघटन मजबूत करण्याविषयी सूचित केले.

मंदिरांच्या आधुनिक प्रचार-प्रसारासाठी सोशल मीडियाचे महत्त्व स्पष्ट करत अक्षय पुंडेकर यांनी सोशल मीडिया व्यवस्थापन, मंदिरांची डिजिटल उपस्थिती आणि भाविकांपर्यंत धार्मिक उपक्रमांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी राजेंद्र सरोदे, श्री क्षेत्र अंबादेवी संस्थानचे माऊली चोर, अनिल पांडे, कालिंका देवी संस्थान धानोरा गुरवचे विद्याधर हेडाक, श्री विठ्ठल विश्वेश्वर मारुती संस्थान कंजरा येथील उत्तम ब्राह्मणवाडे, रेणुका माता संस्थान खर्डा खुर्दचे कैलास शर्मा, श्री हनुमानजी मंदिर संस्थान धानोरा गुरवचे बबन सरोदे, मदन घेवारे यांच्यासह श्री खंडेश्वर संस्थानचे दिनेश शेळके, प्रकाश उमाळे, मंगेश पोफळे, अनिल मारोटकर, निलेश डुकरे, अमित शिंदे, अमोल धवसे, विशाल ढवळे, प्रकाश मारोडकर, निलेश इटवार, विवेक वैष्णव, ओमकार ठाकरे, वासुदेव लोखंडे, आशिष खंडार, मयूर मंडलिक, मंगेश देवळे, देवेंद्र कठाळे, सोपान करडे , एकपाळा येथील रवींद्र काळमेघ आदींसह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध मंदिरांचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.मंदिरांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व देवस्थानांनी एकत्रितपणे संघटित होऊन कार्य करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. मंदिरांच्या हक्कांचे संरक्षण, देवस्थानांच्या मालमत्तेचे जतन आणि धार्मिक-सामाजिक उपक्रमांना व्यापक जनसहभाग मिळवून देण्यासाठी पुढील काळात तालुकास्तरावर सातत्याने समन्वय साधण्याचा निर्धार करण्यात आला.“एक मंदिर – एक संघटन – एक दिशा” या भूमिकेतून मंदिर संस्कृतीच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माध्यमातून व्यापक संघटन उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
