भानुदास विसावे राष्ट्रीय अध्यक्षपदी, तर दत्तात्रय गोतीसे राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने श्री क्षेत्र शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे ८ व ९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात संपन्न झाले. महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी समाजकल्याण मंत्री बबनरावजी घोलप (नाना) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी व समाजबांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशनात सहभाग नोंदविला.

लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या महाअधिवेशनाला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सोलापूरच्या राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे, आमदार अशोक माने, आमदार विवेकभैया कोल्हे, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, राष्ट्रीय सचिव दत्तात्रय गोतीसे, श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, अमरावतीचे माजी आमदार रमेश बुंदिले, विठ्ठलराव दांडगे सर, महिला राष्ट्रीय अध्यक्ष सरोज बिसुरे, राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर कांबळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, प्रदेशाध्यक्ष शांताराम कारंडे, अनिल कानडे, नगरसेवक बापू ठाकरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, महिला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनिषाताई पोटे आणि ऊर्मिला ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
स्वामी कंठानंद महाराजांचे प्रवचन; उमेश कणकवलीकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
महाअधिवेशनात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील प्रवचनकार स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या प्रवचनातून उपस्थितांना आध्यात्मिक व वैचारिक मार्गदर्शन लाभले. तसेच ‘मी विजेता होणार’ या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असलेले मोटिवेशनल स्पीकर उमेश कणकवलीकर यांनी एकपात्री सादरीकरणातून प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांतून आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, ध्येय निश्चिती आणि जीवनात यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित झाले. या दोन्ही कार्यक्रमांमुळे अधिवेशनाला आध्यात्मिक आणि प्रेरणादायी विचारांची जोड मिळाली.

संघटनात्मक बळकटीकरणावर भर
अधिवेशनात समाजाचे प्रश्न, संघटनेचा विस्तार, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, सामाजिक एकजूट आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावयाच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. यापुढे प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेणे, स्थानिक समस्या जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या अधिवेशनामुळे समाजातील संघटनात्मक एकजूट अधिक दृढ होण्यासोबतच आगामी सामाजिक कार्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग
या अधिवेशनाला अमरावती जिल्ह्यातून राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र राजुस्कर, माजी आमदार रमेश बुंदिले, जिल्हाध्यक्ष निलेश जामठे, श्यामकुमार आकोडे, पी. बी. वानस्कर, भास्करराव भटकर, गजानन खंडारे, मनोहर कोथळकर, रामा लाहाळके, सुनील पिंजरकर, दिलीप तायडे, उमेश खंडारे, संजय तायडे, किशोर गव्हाळे, डॉ. गजानन रेवस्कर, देवेंद्र तायडे, भारत वानखडे, जय घोरे, अनिल तायडे, मोतीलाल कठारे, दीपक ठोसरे, संजय चापके, साहेबराव शिवणकर, करण वनारे यांच्यासह ज्योती गव्हाळे, प्रतिभा वनारे, सुनीता वनारे, सीमा आकोडे, पूजा तांडेकर, निशा वनारे, ज्ञानेश्वर वनारे, मनीष गोडवे तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या या महाअधिवेशनामुळे समाजाच्या संघटनात्मक वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली असून, सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संदेश या अधिवेशनातून देण्यात आला.
