पहूर पुलाजवळ मालवाहू गाडीचा अपघात,
नांदगाव खंडेश्वर ते पहूर रोडवर खड्ड्यामुळे टाटा एस मालवाहतूक गाडीचा अपघात; जीवितहानी टळली
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर ते पहूर कडे जात असताना रस्त्यावर नाल्याजवळ पुरामुळे मोठा खड्डा पडला आहे. हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत सुमारे २०१६/१७मध्ये करण्यात आला असावा.दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी अंदाजे ३ ते ४ वाजताच्या सुमारास या खड्ड्यामुळे अपघात घडला.
खड्डा चुकवताना समोरून आलेल्या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात टाटा एस मालवाहतूक गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटले व गाडीचा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. याच ठिकाणी यापूर्वीही अशीच घटना घडली आहे.प्रशासनाला केव्हा जाग येणार? एखाद्या जीवितहानीची वाट बघत आहे का? तेव्हाच लक्ष देणार का? असा संतप्त सवाल करीत प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अशी प्रतिक्रिया गावातील संकेत ठाकरे, आकाश खडसे, यश मारबडे यांनी व्यक्त केली आहे.
