*आली दिवाळी*
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
दिवाळीच्या खरेदीसाठी नांदगाव खंडेश्वर शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. आकाशकंदील खरेदीसाठी लगबग सुरू आहे. यंदा पारंपरिक कागदी आकाशकंदिलांच्या तुलनेत कापडी आकाशकंदिलांना अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र बाजारपेठामध्ये दिसत आहे.
सजावटीतील बदलाबरोबरच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.रंगी बेरंगी कापड, बांबूच्या काड्या आणि पारंपरिक आकाशातील आकाशकंदील दिवाळीच्या सजावटीचे प्रमुख आकर्षण असणार. आता मात्र कागदापासून तयार केलेले विविध रंगसंगती, आकारांचे नक्षीकाम असलेले आणि वैविध्यपूर्ण आकारातील आकाशकंदिल बाजारात उपलब्ध आहेत.

मोठ्या कापडी आकाशकंदिलांसाठी ३०० ते ५०० रुपये
कापडी आकाशकंदिलांच्या किमती त्यांच्या आकारानुसार आणि सजावटीवर अवलंबून आहेत. मोठ्या आकारातील कापडी आकाशकंदिल साधारण ३०० ते ५०० रुपयांपासून उपलब्ध आहे. तसे छोट्या आकारातील एक संच १०० रुपयांपासून मिळतो असून एका संचात १२ आकाशकंदिल असतात. त्यामुळे मोठा आकाशकंदिल तसेच मध्यमवर्गीय सोबतच आकाशकंदिलांचा संच खरेदी करण्याचाही पर्याय ग्राहकांसमोर आहे.
पारंपारिकतेला आधुनिक डिझाईनची जोड
पारंपारिक आकाशकंदिलांवर आकर्षक रंग,विविध नक्षी आणि आधुनिक सजावटीच्या पद्धतींचा वापर वाढला आहे.
