अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
श्री परमहंस परशराम महाराज सेवाधारी परिवार, जळतापूर/पिंपळोद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचा भव्य सामूहिक पारायण सोहळा रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी श्रीक्षेत्र शेगाव येथे अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
श्री माहेश्वरी भवन, एसटी स्टँडसमोर, शेगाव येथे सकाळी ८.३० वाजता पारायणास प्रारंभ झाला. विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो भाविकांनी या ऐतिहासिक व धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्री परमहंस परशराम महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली. सामूहिक पारायणादरम्यान संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता.पारायणानंतर भाविकांनी महाराजांच्या महिमा ग्रंथातील उपदेश व विचारांचे चिंतन केले. त्यानंतर सर्व उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.या यशस्वी आयोजनासाठी श्री जयंत सुरेशराव वानखडे (खामगाव/अमरावती), श्री गोकुळभाऊ शेगोकर (आकोट), श्री शंकरराव खवले (लोखोंडा), श्री शरदराव देवरणकर (अध्यक्ष, शैव गुरव हितकारणी मंडळ, अमरावती), श्री जयंत पुसदकर (अध्यक्ष, निळकंठेश्वर संस्था, अमरावती), श्री भालचंद्रराव कथलकर (अंतरगाव गुरव), श्री राजूभाऊ कथलकर, श्री अशोकराव भारसाकळे, श्री प्रशांतभाऊ देशमुख, श्री परशरामभाऊ डोरस, श्री पुरुषोत्तमराव खंडार, श्री सुरेशराव रोहनकर, श्री कैलासराव डांगे, श्री शुभमराव पुसतकर, श्री ओमभाऊ मोरे, श्री मोहनराव पंडीत, श्री दिपकराव राजनकर, श्री संतोषराव दुत्तोंडे, श्री अशोक आगरकर, श्री चंद्रकांतराव पुसदकर, श्री दत्ताभाऊ कापसे, श्री सचिनराव चौधरी, श्री गणेशराव भांडे, श्री सचिनराव आरोकर, श्री संदीप राजूरकर, श्री हरिहरराव तांबस्कर, श्री प्रभाकर शेगोकर, श्री महेंद्रपाटील कथलकर, श्रीरामशंकर जयस्वाल, श्री दिलीपभाऊ बेलबागकर, श्री गोपालभाऊ चिखलकर, श्री मनोजराव तायडे, श्री राजूभाऊ पुसतकर, श्री दत्ताभाऊ शिंदे, श्री अनिल निहाटकर व श्री नारायणराव डांडगे, अजय राव वाघमारे जयेंद्रपाटील, बंडूपंत मोरे, सतीशराव पांडे, व इतर सर्व संस्थांवरील सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सेवाधारी, दानशूर भक्तण, ज्या समाज बांधवांनी व भक्तांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग दिला तसेच सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा त्यांनी महाराजांच्या कार्याचे प्रचार प्रसार मध्ये मोलाचा सहभाग दिला या सर्वांचे आभार आयोजक जयंत सुरेशराव वानखडे अमरावती यांनी मानले.
