प्रमोद पोकळे यांच्या भजन-संध्येने बडनेरेकर मंत्रमुग्ध!
अभंग, भजन आणि गौळणींनी रंगली बडनेऱ्यातील भक्तिरसाची मैफल!
अंजनगाव बारी/पवन इंगोले
बडनेरा शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या श्रीसंत सावता युवक मंडळाच्या वतीने दिवाळी पाडव्यानिमित्त जुन्या बडनेऱ्यातील सावता मैदानावर श्रीराम विजयोत्सव, भव्य नरकासूर दहन आणि संगीत-भजन संध्येचे आयोजन करण्यात आले. तब्बल ८८ वर्षांची परंपरा जपणारा हा सोहळा यंदाही हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दूरदर्शन व आकाशवाणी लोककलावंत प्रमोद पोकळे व गुरुदेव सेवा मंडळ, बडनेरा यांच्या संगीत-भजन संध्येने झाली. प्रभू श्रीरामाच्या नामगजराने सुरुवात झालेल्या या भक्तिमय मैफिलीत प्रमोद पोकळे यांनी एकापेक्षा एक सरस अभंग, भजने, भक्तिगीते आणि गौळणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सुमधुर गायनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. बडनेरा शहरासह पंचक्रोशीतील शेकडो रसिकांनी या संगीत मैफिलीचा मनमुराद आनंद लुटला.

या कार्यक्रमात तबल्यावर महेंद्र औरंगपुरे यांनी साथसंगत केली, तर टाळ व सहगायनासाठी राजेंद्र इंगोले, गणेश खंडार, सुभाष सुने, सुनील तायडे, बबन दारोकार, मनोज संभे, विजय दारोकार आणि राजेश टारपे यांनी योगदान दिले. भक्ती, संगीत आणि कलेचा सुंदर संगम या भजन-संध्येतून अनुभवायला मिळाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बडनेरा मतदारसंघाचे आमदार रविभाऊ राणा, उपमहापौर सचिन भेंडे, भाजप प्रदेश सरचिटणीस जयंत डेहनकर, बडनेरा पोलीस निरीक्षक पुनीत कुलट, मध्यप्रदेशचे संचालक राजकुमार पांडे, नगरसेवक नाना आमले, अजय जयस्वाल, किशोर जाधव, रजनी डोंगरे, संदीप कांबळे, प्रशांत लांडे, श्रीकांत येते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष किशोर पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गायक प्रमोद पोकळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अभिजित लांडे, संजय चेडे, आशीष आकोटकर, अजय खरबडे, मुकेश उसरे, सचिव गौरव बांते, सचिन डहाके, हर्षल बोबडे, सचिन वऱ्हेकर, प्रदीप पवित्रकार, कोषाध्यक्ष रविंद्र बोटके, संजय जोशी, रविंद्र तऱ्हेकर, गणेश डहाके, सुजय पवार, मधुकर श्रीखंडे, ईश्वर हाडोळे, प्रशांत मालपे, निखिल लडके, सागर पवार, शरद ठोसरे, मनीष कुथे, शुभम मोरे, दीपक महाजन, विनायक ढोले, दिगंबरराव तायडे, साहेबराव तायडे, बंडुभाऊ वऱ्हेकर, नुतन भुजाडे, दिनेश येते, नितीन नागपुरे, पुंडलिक सपाटे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
