गावकऱ्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि शिक्षणाधिकारी यांच्या यांच्याकडे मागणी
नांदगांव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत मागील तीन-चार वर्षांपासून शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे गावकरी नागरिक व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने दिनांक 16 सप्टेंबर ला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय अमरावती व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदन देऊन तातडीने शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली.
इयत्ता सहा ते आठ भाषा आणि सामाजिक शास्त्र, इयत्ता नऊ ते दहा भाषा शिक्षक आणि अकरावी ते बारावी मराठी शिक्षकांची गरज आहे.

पटसंख्या कमी असल्याचे कारण पुढे करून महाराष्ट्रातल्या अनेक मराठी शाळा बंद करण्याचं कारस्थान सरकार करत असताना शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे मंगरूळ चव्हाळा जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत तातडीने शिक्षक देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते बाळासाहेब राणे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव संतोष सुरजुसे, शिक्षक नेते सुधीर भाऊ केणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन गंधे, किसान सभेचे ज्ञानेश्वर सुरजुसे, शिक्षक नेते नरेश शुक्ला सर, वासुदेवराव चौधरी, देवानंद सोनोने , प्रशांत गुल्हाने , इत्यादी उपस्थित होते.
