डीजे ऐवजी पारंपरिक वारकरी दिंडी आणि गुलालाऐवजी होणार फुलांचा वर्षाव.
पर्यावरणपूरक व प्रबोधनपर गणेशोत्सवाचा आदर्श
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
मंगरुळ चव्हाळा येथील नाका परिसर, महादेव मंदिर येथे लयभारी गणेशोत्सव मित्र मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव २०२६ अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने दिनांक १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत धार्मिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक अशा विविध उपक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य व्यवस्थापक मा. श्री. मनोज प्रल्हादराव गावनेर आणि अध्यक्ष मा. चि. गौरव मंगेशराव गुल्हाने यांनी दिली आहे.यंदाच्या गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवाच्या माध्यमातून महिला, बालक, विद्यार्थी, युवा आणि शेतकरी अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमातून समाजप्रबोधन
मंडळाने केवळ मनोरंजनावर भर न देता सामाजिक बांधिलकी जपली आहे. महोत्सवात सादर होणाऱ्या समाजप्रबोधनपर नाटिका व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा, रस्ता सुरक्षा, कायद्याचे पालन, स्त्री-पुरुष समानता, सर्वधर्मसमभाव, अंधश्रद्धा निर्मूलन आणि महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.पर्यावरणपूरक व आदर्श विसर्जन मिरवणूक: मंडळाने यंदा एक नवा आणि आदर्श पायंडा पाडला आहे. शेवटच्या दिवशी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत कानठळ्या बसवणाऱ्या ‘डीजे’चा (DJ) वापर पूर्णपणे टाळून पारंपरिक वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आणि आरोग्य जपण्यासाठी गुलालाचा वापर न करता, संपूर्ण मिरवणुकीत फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे.
समाजाभिमुख कार्यक्रम
समाजप्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज सर्व संत रचित अभंगांचे महिला व पुरुष भजन मंडळांच्या वतिने भजनाचा कार्यक्रम, विद्यार्थी युवकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षेची समज व्हावी यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा, वृक्षारोपण व ग्रामस्वच्छता, महिला भगिनी व बालकांसाठी लिंबू चमच, संगित खुर्ची, चक्कर रेस, रूमाल पळविणे स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, ऑपरेशन कवच बाबत जनजागृती, आरोग्य शिबिर, बक्षिस वितरण व सत्कार सोहळा या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहेत.या सर्व उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी आणि व्यवस्थापनासाठी परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, युवक आणि महिला भगिनी, पोलिस स्टेशन, गावातील पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांचा अतिशय सक्रिय सहभाग लाभत आहे. मंडळाचे उपाध्यक्ष आदित्य कुकडे, सचिव राहुल सुरुजुसे, सहसचिव विशाल ढोकणे, कोषाध्यक्ष कुणाल अवझाडे, गणेशराव अवझाडे, डॉ. प्रा. गजानन काकडे, सागर गावनेर, सतीश शिंदे, रोहित राऊत, उदय चरपे, नारायण सरोदे, हितेश गावनेर, सागर बुधले, मनिष धामणकर, शुभम गुल्हाने, सुमित बुधले, युवराज सुरजुसे, उमेश केवट, आदित्य पैठणकर, आकाश ढोकने, अक्षय वारकर, राज अवझाडे, प्रज्वल वारकर, विक्रम गावनेर, मनोज नांदुरकर, अविनाश गावनेर, विशाल सावरकर, प्रज्वल तांबटकर, तेजस तांबटकर, साहिल मेहरे, शिवम शेलोकार, ओम मुंजेवार, आकाश भवरे, अनिकेत गुल्हाने, देवांशू बुधले, अर्पित बुधले, शुभम चौधरी, पंकज चरपे, भाविक पिंपळकर, सागर पिंपळकर, जय विश्वकर्मा, ओम विश्वकर्मा, जगदीश विश्वकर्मा, रोहन विश्वकर्मा, राहुल गुप्ता, चेतन करडे, योगेश करडे, चेतन रावेकर, रितेश सुरजुसे, अतुल खांडेकर, दिपराज झोपाटे, तेजस पिंपळकर, नितीन बिसने, अजय भागवत, सचिन जिरापुरे, मिथुन तांबटकर, गजानन काळे, विलास चरपे, माधव पुनसे, अजय तळोकार, अमोल तांबटकर, पंजाब सुरजुसे, प्रमोद गुल्हाने, गजानन मुल्हार, प्रभाकर गुल्हाने, संतोष पिंपळकर, श्रेयस गंधे, अनुज राऊत, नंदन काकडे, यश वारकर, सर्वज्ञ राऊत, हर्षल पुनसे, ध्रुव राऊत, श्रवण पैठणकर, विराट अवझाडे, सोहम काकडे, कृष्णा गावनेर, आर्यन बुधले, प्रेम गुल्हाने, साहिल पुनसे, तनुज गावनेर, ओम गावनेर, विहान सुरजुसे, रुपेश नेमाडे, अमर अवझाडे, विघ्नेश मुल्हार, साहिल पिंपळकर सर्व सदस्य व कार्यकर्ते यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मंगरुळ चव्हाळा व परिसरातील सर्व भाविकांनी या प्रबोधनपर महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
