अडीच वर्षापासुन नुतनीकरणाचे काम प्रलंबित..
अंजनगाव बारी / पवन इंगोले
परिसरातील मालखेड (रेल्वे) ते दहिगाव घावडे हा मुख्य मार्ग थेट चांदूर (रेल्वे) जोडला गेला असुन, मालखेड पासून दहिगाव घावडे या मार्गाची दुरावस्था आहे. या मार्गाबाबत परिसरातील गावकऱ्यांनी सन २०२४ पासून नुतनीकरणाची मागणी संबधीत शासणाकडे रेटून धरली आहे. मात्र अडीच वर्षे उलटून अद्यापही या मागचे नुतनीकरण झाले नाही.मालखेड रेल्वे हि जवळपासच्या छोट्या गावांची प्रमुख बाजारपेठ असुन रेल्वे स्थानकही आहे. तेंव्हा अशा हलाखीच्या मार्गाने दळणवळणासाठी संबंधीत गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. यातच दहीगाव धावडे कडे जाणाऱ्या वळणदार रस्त्या वरील नदीजवळील पूलावर १०० मी. रस्ता खोलगट असल्याने किरकोळ अपघातांबरोबर मालवाहु जड वाहणे पलटी झाल्याच्या घटना घडत आहे.मार्गाची दूरावस्था लक्षात घेता, तात्पुरती डागडुजी करून जाण्या-येण्यास सुविधा होईल असेही म्हणता येत नाही. कारण संपूर्ण रोड उखरलेला आहे. याबाबत गावकऱ्यांनी सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकी आधी संबंधीत आमदारांना याबाबत प्रत्यक्ष तसे लेखी स्वरुपात तक्रार देऊनही आजगायताही त्याचा काही उपयोग नाही, आश्वासने देऊन बजनतेला दिलासा तर देता येतो, मात्र अकार्यक्षमता दाखवून लबाड पणाही जनतेच्या दृष्टीस पडतो.? हे मात्र कार्यकर्ते विसरतात. हे लक्षात घेता परिसरातील नागरीकांनीभेट प्रशासनाकडे धाव घेउन या मार्गाबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी जि.प. बांधकाम विभाग यांचे कडे लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे.

प्रमुख रेल्वे स्टेशन मार्गही निकामी
दहिगाव घावडे ते मालखेड रेल्वे स्टेशन मार्गापर्यंत रोडची अवस्था दयनिय दयनीय असल्याने प्रमुख मार्ग गेल्या १० वर्षापासून असुविधाजनक आहे. या मार्गावर शाळा, महाविद्यालय आरोग्य केंद्र इ. संस्था असल्याने प्रवाशांबरोबरच, रुग्ण, शाळकरी मुले तसेच इतर नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत प्रमुख वृत्तपत्रातुन मार्गाची ही अवस्था उघडकीस आणण्याचा ग्रामप्रमुखांनी प्रयत्न करुनही, प्रशासणाकडून दखल न घेण्याचे कारण काय.? असा सवाल आता नागरीक करीत आहे.तेंव्हा उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत जातीने लक्ष घालून नागरीकांना गैरसोयीपासून मुक्त करावे. मालखेड से दहिगाव मार्गाच्या नुतनीकरणाची अंमलबजावणी त्वरीन न झाल्यास संबधीत नागरीकांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तसेच संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
