ना कशाची भीती ना वरिष्ठ अधिकाऱ्यांची चिंता.
नागरिकांना सांगतो सर्व अधिकारी माझ्या खिश्यात; मग कार्यवाही करणार तरी कोण ?
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज ऐकावे ते नवलच असून येथील कर्मचारी दररोज काय कारनामे करून ठेवतील हे सांगताच येत नाहीत अश्यातच या रुग्णालयातील एक शासकीय ictc कर्मचारी प्रदीप चव्हाण नामक हा दररोज अकोला येथून नांदगाव खंडेश्वर येथे अपडाऊन करतो.आणि तो बारा वाजताच्या नंतरच ड्युटीवर येतो एक दोन तास ड्युटी करून तो मस्तपैकी निघून जातो हा त्याचा नित्यनेमाचा कार्यक्रम सुरू असून एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने शहरातील मध्य वस्तीमध्ये आपली स्वतःची ब्लड बँक सुद्धा गेल्या दोन वर्षांपासून सुरू केलेली आहे तो ग्रामीण रुग्णालयात एक दोन तास थांबल्यानंतर दिवसभर तो खुलेआमपणे स्वतःच्या खाजगी ब्लड बँकेत थांबतो आणि याबाबत त्याला काही नागरिकांनी विचारणा केली असता सांगतो की ती ब्लड बँक माझी नाही मी सहजपणे तिथे कधीकधी जातो ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी करीता येणाऱ्या रुग्णांना तो सर्व कर्मचाऱ्यासमोर खुलेआमपणे सांगतो की तपासणी सुविधा येथे उपलब्ध नाहीत त्यामुळे तुम्ही माझ्या खाजगी ब्लड बँकेत या मी तुम्हाला सर्व तपासण्या अल्प खर्चात करून देतो त्यामुळे तालुक्यातून येणारे गरीब रुग्ण त्याच्या या अपप्रचाराला बळी पडत असून तो अशा रुग्णांकडून चांगलेच पैसे उकळत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा शल्य चिकित्सक आणि ictc प्रकल्प प्रमुख कार्यक्रम अधिकारी इरविन रुग्णालयाकडे करण्यात आलेल्या आहेत याबाबत अनेकदा वृत्तपत्रात बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या परंतु त्या निगरगट्ट ictc कर्मचाऱ्यावर कार्यवाही करीता कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आजवर हिंमतच केली नाही त्याला मुख्य कारण म्हणजे हा ictc कर्मचारी तक्रार दाराना सांगतो की तुम्ही माझी तक्रार कुठेही कुणाकडेही खुशाल करा आपले काहीच होणार नाही कारण आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी हे आपल्या खिश्यात आहेत “अपना कोई कुछ नहीं कर सकता” येवढ्या प्रमाणात तक्रारी होऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने त्याचे म्हणणे नागरिकांना आता खरे वाटायला लागले असून अशा कर्मचाऱ्यांमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच बदनामी तालुक्यातील रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये होत आहे हे सुद्धा तितकेच खरे आता या कर्मचाऱ्याची उचलबांगडी होणे अत्यंत महत्त्वाचे असून याकरिता शहरातील काही सामाजिक संघटना तयारीला लागलेल्या आहेत. या कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे तालुका वाशीयांचे लक्ष लागले आहे.
