शाहीर कॉम्रेड धम्मा खडसे यांना अण्णाभाऊ साठे विचारजागर जीवन गौरव पुरस्कार प्रदान
आयटक राज्य सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे यांचेही मार्गदर्शन
मंगरूळ चवाळा येथे शहिद दिनानिमित्त AISF-AIYF च्या वतिने प्रबोधनात्मक जाहिर सभा व क्रांतिगीतांचा शाहिरी जलसा
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
साम्राज्यशाही आणि भांडवलशाही गाडल्याशिवाय जगामध्ये सुख आणि शांती नांदू शकत नाही हे आज जगातील युद्धाच्या परिस्थितीवरून आणि भारतातील धर्मांध राजकारणावरून सिद्ध झाले आहे.साम्राज्यशाहीची भूक जगातील छोट्या आणि कमकुवत देशांना गिळंकृत करण्याचे आहे. त्याचबरोबर देशांमध्ये 2014 पासून सत्तेमध्ये बसलेले नरेंद्र मोदी सरकार हे भांडवलदारांच्या हातचे कळसुत्री बावले आहे.युद्धाच्या परिस्थितीमुळे जगातील सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून त्याची झळ आपल्यालाही प्रचंड प्रमाणात बसत आहे. गॅस व पेट्रोलचा तुटवडा आणि वाढत्या किमती हे सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे मुश्किल करणार आहे. केंद्र सरकारच्या अमेरिकेसमोर नांग्या टाकण्याच्या धोरणामुळे व लोटांगण घालण्याच्या प्रवृत्तीमुळे देशातील जनता संकटात सापडली आहे. विदेशी धोरण पूर्णपणे असफल झाले आहे. भारताचा परंपराग मित्र इराण व रशिया दुरावला जात आहे.
अमेरिकेची दादागिरी वाढत आहे. त्याचबरोबर देशातील कामगार, कष्टकरी शेतकरी शेतमजूर महिला हे सर्व घटक अत्यंत संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत भगतसिंगाच्या विचाराला अनुसरून कार्य करण्याची गरज आहे असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव कॉम्रेड सुभाष लांडे यांनी केले ते भाकपच्या मंगरूळ चव्हाळा येथे आयोजित जाहीर सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.एफस्टीन फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री हार्दिक पुरी व अनिल अंबानी यांची नावे आली आहेत त्याचप्रमाणे मोदी यांचे मित्र गौतम मदानी यांच्यावर अमेरिकेत खटला सुरू आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांच्यासमोर घुटणे टेकत आहेत. आता त्याविरुद्ध सर्वसामान्य जनतेलाच संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज आहे असेही कॉम्रेड सुभाष लांडे आपल्या भाषणात म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये अशोक खरात नावाचा भोंदू बाबा हा फडणवीस सरकारच्या आशीर्वादानेच एवढे मोठे साम्राज्य उभे करू शकला व कित्येक महिलांचे लैंगिक शोषण केले महिला आयोगाचे अध्यक्ष त्यांच्या भक्त बनवून संविधानाची पायमल्ली करत होत्या. या सर्व परिस्थितीला आरएसएसचे केंद्र आणि राज्यातील सरकार जबाबदार आहे असे प्रतिपादन आयटकचे राज्य सरचिटणीस व भाकपचे राज्यसहसचिव कॉम्रेड सुभाष लांडे यांनी केले. कॉम्रेड धम्मा खडसे यांना क्रांती साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विचार जागर जीवन गौरव पुरस्कार कॉम्रेड धम्मा खडसे यांना याच कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक कॉम्रेड गणेश अवझाडे यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित केले.मंगरूळ चवाळा येथे 23 मार्च शहिद दिनानिमित्त जाहिर सभा व शाहिर धम्मा खडसे यांचा शाहिरी जलसा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाला AISF व AIYF च्या आवाहनाने मंगरूळ चवाळा शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बाहेरगावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.मंगरूळ चवाळा येथे दरवर्षी शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहिद दिनानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो व जनमाणसांत क्रांतिकारी विचार पेरला जातो. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF), ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF) मंगरूळ चव्हाळा शाखेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून देऊन सर्वसामान्य कष्टकरी यांचे समानतेचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी आपला अभ्यासू क्रांतिकारी विचार मांडून हसत फासाचे चुंबन घेऊन देशासाठी प्राण अर्पण करणारे महान समाजवादी क्रांतिकारक शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा क्रांतिचा विचार व उद्देश सामान्यांपर्यंत पोहोचवा यासाठी मंगरूळ चवाळा गाव शाखेत शहिद दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने जाहिर प्रबोधन सभा व शाहिर धम्मा खडसे यांच्या क्रांतिगीतांचा शाहिरी जलसा संपन्न झाला तसेच शाहिर धम्मा खडसे यांचा नागरि सत्कार सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव कॉ. सुभाष लांडे, आयटक चे राज्य सचिव कॉ. श्याम काळे, बांधकाम कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस कॉ. संजय मंडवधरे, CPI चे जिल्हा सहसचिव तथा AISF-AIYF चे जिल्हा डिपार्टमेंट प्रमुख कॉ. सागर दुर्योधन, AISF चे माजी राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. गणेश अवझाडे, CPI चे तालुका सचिव कॉ. संतोष सुरजूसे, AIYF चे माजी जिल्हाध्यक्ष सतिश शिंदे, माजी सरपंच विकास आगाशे, मधुकर बनकर, प्रदिप तांबटकर, सुरेश बिसने, पंजाब वैद्य, CPI शाखा सचिव कॉ. मनोज गावनेर हे प्रामुख्याने उपस्थित होते.सायं ६ ते ७.३० जाहिर सभा व त्यानंतर संध्या ७.३० ते १० या वेळेत शाहिर धम्मा खडसे व संच यांच्या प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणाऱ्या पहाडी आवाजात अर्थपूर्ण क्रांतिगीतांचा शाहिरी जलसा संपन्न झाला. भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड विनोद जोशी, चांदुर रेल्वे तालुका सचिव कॉम्रेड सतीश चौधरी,कॉम्रेड अरुण भाई शिंदे, हे प्रामुख्याने उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटक च्या वतीने धम्मा खडसे यांना क्रांती साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल व अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अमरावती जिल्हाध्यक्ष कॉ.संजय मंडवधरे, जिल्हा सचिव कॉम्रेड ज्ञानेश्वर मेश्राम, जिल्हा कार्याध्यक्ष कॉ.जयेन्द्र भोगे, कोषाध्यक्ष प्रज्ञाताई बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष वैशालीताई निस्वादे उपाध्यक्ष कॉम्रेड संदीप ओके जिल्हा सहसचिव कॉम्रेड प्रतिभाताई मेश्राम,जिल्हा संघटक मालाताई वानखडे कॉम्रेड संतोष राऊत, कॉम्रेड वैशाली निस्वादे, कॉम्रेड रेखा हिंगवे, नरेंद्र पिठे, वाशिम जिल्हा सचिव कॉम्रेड संजय बाजड हे संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.विद्यार्थी, युवक, महिला भगिनी, कष्टकरी, शेतकरी, कामगार, सर्व गावकरी मंडळी कार्यक्रमा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाखा सचिव कॉम्रेड मनोज गावनेर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव कॉम्रेड संतोष सुरजुसे यांनी केले.यावेळी AISF चे शाखाध्यक्ष उदय चरपे, उपाध्यक्ष सागर बुधले, सचिव गौरव गुल्हाने, कोषाध्यक्ष उमंग गावनेर, AIYF चे शाखा अध्यक्ष विक्रम गावनेर, उपाध्यक्ष पंकज चरपे, सचिव पंजाब सुरजूसे, कोषाध्यक्ष प्रज्वल तांबटकर, गणेशराव अवझाडे, सतिश शिंदे, मनोज गावनेर, विशाल राऊत, विशाल सावरकर, हनुमान शिंदे, उमेश गावनेर, योगेश अवझाडे, अविनाश गावनेर, यश अवझाडे, राज अवझाडे, साहिल पिंपळकर, अंकुश गाढवे, कार्तिक अवझाडे, विलास चरपे, युवराज सुरजूसे, मनिष धामणकर, अनुज राऊत, यश वारकर, श्रेयस गंधे, आकाश भवरे, आकाश ढोकणे, विशाल ढोकणे, नारायण सरोदे, अजय भागवत, आदित्य कुकडे, कार्तिक ठवकर, तेजस तांबटकर, धम्मदिप वानखडे, रतन वानखडे, राज खंडारे, हितेश गावनेर, आदर्श टेवरे, अभिषेक बुधले, ओम बुधले, आदित्य पैठणकर, नितिन बिसने, चेतन करडे, मनोज नांदुरकर, सागर गावनेर, संजय वानखडे, राहुल इंगळे, वैभव इंगळे, शाम बुधले, मिथुन तांबटकर, उमेश केवट, रंजित तिरमारे, अक्षय तिरमारे, नामदेव खंडारे, रामेश्वर बनसोड, दिलीप गायकवाड, प्रकाश गायकवाड, सुमित बुधले, रूपेश नेमाडे, अमोल पैठणकर, हर्षल गावनेर, रोहन विश्वकर्मा, राहुल गुप्ता, तेजस पिंपळकर, अनिकेत कारेकर, अभय टांगले, विकी टांगले, रितेश सुरजूसे, राहुल सुरजूसे, उमेश पवार, रवेश भोसले, हर्षल पुनसे, शरद टांगले, मुरली लुटे, सौरभ इलमे, भाविक पिंपळकर, सागर बिसने, अनिल ढोले, शुभम चौधरी, सचिन जिरापुरे, राजिक शहा, शेख हसन, समीर शेख, आसिफ शहा, साजिद शेख, विलास पांडव, अनिल शिंदे, अभिषेक सोनोने, सचिन सोनोने, मंगेश जिरापुरे, संतोष बनकर, चंदु बनकर, गोपाल लांजेवार, निलेश शेलोकार, शुभम इनवते, प्रफुल सपाटे, यश लोणारे, अथर्व गावनेर व तसेच AISF-AIYF चे सर्व सदस्य, महिला फेडरेशन च्या सर्व सदस्या, भाकप चे सदस्य कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.
