विद्यार्थ्यांसाठी रंगभरण, निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
युग अभ्यास अकॅडमी, हातुर्णा यांच्या वतीने अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. “विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत” या विचारातून अकॅडमीमार्फत वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात.यावर्षी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्र रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडे सादर केले, घोषणाबाजी केली तसेच प्रेरणादायी भाषणे देऊन उपस्थितांची मने जिंकली.

🏛️ हनुमान मंदिर येथे उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न
हा भव्य कार्यक्रम पूर्ण पुनर्वसन येथील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाला ज्ञानेश्वर काळबांडे, विकी भाऊ ठाकूर, विवेक भाऊ ओठर, राहुल भाऊ माने, शंकरराव सैरीसे, बाळू भाऊ भांगे, भूषण भाऊ वाणे, विश्वासराव जाधव, सिद्धांत अठोर, ज्ञानेश्वरराव बागडे, मुक्तेश्वरराव घाटे यांच्यासह गावातील इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच सुशीला ताई जाधव, गुडदे ताई, मंगलाताई अठोर, अस्मिता ताई अठोर, रूपालीताई इंगळे, सेरीसे ताई यांचीही उपस्थिती लाभली.प्रश्नमंजुषा स्पर्धेचे परीक्षक म्हणून राहुल भाऊ माने व नुतेश भाऊ रडके यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन सौ. पूजा नुतेश रडके पाटील यांनी केले.गावातील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि आजचे विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक बनावेत या हेतूने युग अभ्यास अकॅडमी हातुर्णा सातत्याने अशा प्रेरणादायी व विधायक उपक्रमांचे आयोजन करत असते.
