नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत अंतर्गत होणारे विकास कामादरम्यान, काँक्रीटचा माल (काँक्रीट मिक्स) हाताने/मॅन्युअली न बनवता. कामात पारदर्शकता (transparency) यावी आणि काँक्रीटचे योग्य प्रमाण (proper ratio of concrete) वापरले जावे, यासाठी मिक्सरचा वापर केला जात असतांना सर्व काँक्रीटचा माल हा केवळ आणि केवळ काँक्रीट मिक्सर मशीनद्वारेच (concrete mixer machine) बनवण्यात यावा. माल बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्थानिक नागरिक, प्रभागातील लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष, सभापती,नगरसेवक, नगरसेविका, आणि जागरूक कार्यकर्त्यांना हजर राहण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून कामाची गुणवत्ता सुनिश्चित करता येईल.शासकीय निधीचा योग्य वापर व्हावा आणि काम दीर्घकाळ टिकावे, यासाठी ही पारदर्शक पद्धत अवलंबणे अत्यंत आवश्यक असल्याने नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत अंतर्गत होणारे विकास कामे रस्ता / नाली कामासाठी मिक्सरद्वारे काँक्रीट माल बनविण्याची प्रक्रिया स्थानिक नागरिकांच्या व लोकप्रतिनिधीच्या नजरेसमोर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने मुख्याधिकारी यांना विनंती केली की, नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या अंतर्गत विविध निधीतून सुरू असलेल्या व सुरु होणारे रस्ता व नाली बांधकाम काँक्रिटीकरण कामामध्ये वापरण्यात येणारा मिक्सर माल (काँक्रीट) हा स्थानिक नागरिकांच्या व लोकप्रतिनिधी व प्रभागाचे नगरसेवक /नगरसेविका यांचे नजरेसमोर बनवण्यात यावा. या मागील मुख्य उद्देश म्हणजे कामात पारदर्शकता आणणे आणि शासनाच्या नियमांनुसार योग्य दर्जाचे साहित्य ( सिमेंट, वाळू, खडी,योग्य प्रमाणात ) वापरले जात आहे का, याची खात्री करणे हा आहे. कामाचा दर्जा चांगला राहिल्यास रस्त्याचे आयुष्यमान वाढेल व शासकीय निधीचा योग्य वापर होईल. या संदर्भात संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाला सदर माल बनवण्याची प्रक्रिया प्रभागातील रहिवाशी नागरिकांचे किंवा स्थानिक प्रतिनिधीं नगरसेवक नगरसेविका याच्या देखरेखीखाली करण्याची सूचना द्याव्या अशी मागणी एका लेखी निवेदनाव्दारे नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने यांनी मा. मुख्याधिकारी साहेब नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर यांना केली आहे.
