कर्जबाजारीपणाला कंटाळून घेतला गळफास
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोळवण या गावातील एका शेतकरी महिलेने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपले जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दिवाळीच्या सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सौ. माला महादेव मेश्राम (वय अंदाजे 40 वर्षे), रा. जावरा मोळवण, या शेतकरी महिला आपल्या दोन एकर शेतीवर उपजीविका करत होत्या. परंतु मागील काही हंगामांपासून शेतीत उत्पन्नात घट होत असल्याने आणि त्यावर वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या. या आर्थिक अडचणींना कंटाळून त्यांनी दि. 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 10 वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.दिवाळी सारख्या आनंदाच्या सणादिवशी घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवरील आर्थिक संकटाचे गांभीर्य पुन्हा एकदा पुन्हा अधोरेखित करते.स्थानिक नागरिकांनी शासनाकडे मागणी केली आहे.अशा घटनेतून धडा घेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत व कर्जमुक्तीची प्रभावी उपाययोजना करण्यात यावी.
