अचलपूर/ फिरोज खान
दिवाळीचा जल्लोष रेल बचाव सत्याग्रह समितिने स्वच्छता अभियान, फराल, मिठाई, साड़ी,फटाके वाटप करुण नागरिक यांच्या शेकडो हाथांने शेकडो दिवे,हार फूले लावून परिसरात केला दिपोत्सव दिवाळीचा उत्सव प्रत्येकजन हा आप आपल्या घरात साजरा करतो, आपल्या संस्कृतिचा सर्वात मोठा सन म्हणुन दिवाळी तर मुस्लिम यांचा उत्सव म्हणुन ईद आपल्या भारत देशात साजरी होते.. पण हाच उत्सव जर सामाजिक एकतेतुन गोरगरीब,नागरिक, बाल गोपाल, महिला यांच्या सार्वजनिक एकत्रित येवून एकाच ठिकाणी साजरा होत असेल तर विषमतेचा अंधार मिटून एकतेचा प्रकाश व आनंद झडकतो, याच सर्व बाबीचा विचार करत गेल्या 7 वर्ष पासून शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिति आपल्या अनोख्या 37 व्या अहिंसक जनआंदोलन मधील टप्प्यात आज रोजी रेल्वे स्टेशन अचलपुर येथे शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिति, माहेर फाउंडेशन, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन,जमात ए इस्लामीक महिला संघटन, मानव सेवा समिती, व्यापारी संघटन,क्रांति ज्योति संघटन यांच्या वतीने दुपारी 4 वाजता स्वच्छता अभियान मधून रेल्वे स्टेशन परिसर स्वछ करण्यात आला, संध्या 5 वाजता परीसर मधील महिला यांना माहेर फाउंडेशनच्या वतीने साड़ी वाटप करण्यात आल्या,

तर सत्याग्रह समितिच्या वतीने महिला,नागरिक यांना फराल, मिठाई व फटाके वाटप करण्यात आला,संध्या 6 वाजता शेकडो हाथाने रेल्वे ट्रैक वर दिवे आणि फुले सजवून रोशनाई करत बाल गोपाल सोबत उत्साह साजरा करण्यात आला.यावेळी जमलेल्या बालगोपालाना जेव्हा फराळ आणि फटाक्यांचे पाकीट मिळाले तेव्हा त्यांच्या कोवळ्या चेहऱ्यावर उजळलेला आनंद..लक्ष दिपांपेक्षाही उजळ वाटला.

शकुंतला ब्रॉडगेजचा डीपीआर मार्गी लागल्याने तथा इतिहास जमा होणारी शकुंतला रेल पुन्हा एक्सप्रेस बनून धावेल या लाखो लोकांच्या आशेचे द्वार शेवटी शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितिच्या अदभुत अशा प्रयत्न, आंदोलने मुळे मोकळे झाल्याने नागरिक यांच्यात प्रचंड ऐसा आनंद दिसला.. यावेळी शकुंतला रेल बचाव सत्याग्रही योगेश खानजोड़े,डॉ राजा धर्माधिकारी, दीपा तायड़े, शारदा उइके, संजय डोंगरे, शंकर बारखड़े, दयाराम चन्देले, विजय गोंड़चवर,राजेश पांडे, मुरलीधर ठाकरे, रामदास मसने, कैलाश ठोसर, सारिका ताई, प्यारेलाल प्रजापति सह जमाते ए इस्लामिक हिंदच्या महिला मेहरबानो, नझिया खान, नगमा कौसर, मुब्शेर फिरदौस, यास्मीन बानो सदर सत्याग्रही उपस्थित होते,सदर सामाजिक उपक्रमात विशेष योगदान* दिवाळी कार्यक्रमची पुढील जवाबदारी पुढील सत्याग्रही यांनी घेतलेली आहे….प्रकाश दिप:-श्री राजाभाऊ धर्माधिकारी,नमकीन चिवड़ा:-श्री राजेश अग्रवाल,मिठाई:- श्री राजकुमार बरडिया,फटाके:-श्री राजेन्द्र जयसवाल,श्री संतोष नरेडी,श्री कमल केजरीवाल,पेय जल:-श्री शंकर बारखडे,साड़ी वाटप:-सौ दिपाताई तायड़े,शारदा उइके,स्वछता अभियान:-संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापति, योगेश खानझोड़े,हार-फुले सजावट:-श्री विजय गोंड़चवर,मुरलीधर ठाकरे यांनी स्वीकारली.
