महाराष्ट्राचे राज्य संघटक ‘आझाद जमा खान’ आवर्जून उपस्थित.
ओझोन जनजागृती दिवसाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
प्रभावी संवाद हा यशस्वी शैक्षणिक वातावरणाचा पाया असतो. 16 सप्टेंबर ओझोन जनजागृती दिवसा निमित्ताने अक्षर मानव अमरावती व वर्धा जिल्हा कार्यकारिणी तर्फे श्री. सोमनाथ विद्यामंदिर, उमरी, ता. कारंजा (घाडगे) जिल्हा वर्धा. या शाळेत ‘ विद्यार्थी संवाद ‘ (युवा संवाद) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर या शाळेच्या 43 वा वर्धापण दिन सुद्धा साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सतीकृपा शिक्षण संस्था वर्धा येथील संचालक मा. श्री. अरुणराव ढोले सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अक्षर मानव संघटनेचे महाराष्ट्राचे राज्य संघटक तथा विदर्भाचे पालकमंत्री आझाद जमा खान आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी सोबत मोकळा संवाद साधण्यासाठी अक्षर मानव अमरावतीच्या जिल्हा सचिव सौ. अश्विनीताई वितोंडे-खान व आर्वीच्या सुप्रसिद्ध महिला समुपदेशक तथा कवयित्री, लेखिका प्रांजली ताई आत्राम कार्यक्रमाला विशेष उपस्थित होत्या.अक्षर मानव संघटना साहित्य, समाज, कला, शिक्षण, पर्यावरण, उद्योग, श्रम, विज्ञान अश्या मानवी जगण्याच्या शंभर अधिक विषयात संघटना राज्यभर काम करते. सर्व भेदांच्या पलिकडे जाऊन कुटुंब आणि समाजव्यवस्थांच्या भल्यासाठी काम करते अशी माहिती राज्य संघटक श्री. आझाद खान यांनी देवून अक्षर मानवची भुमिका मांडली. आयुष्यात आपल्याला मोठे व्हायचे असेल तर घरी जसं आपण आपल्या आई-वडिलांच ऐकतो त्याच प्रमाणे आपण आपल्या शाळेतील शिक्षकांच ऐकायला पाहिजे. आपल्याला आकाशात उंच भरारी घ्यायची असेल तर मुलांनी शिक्षकांचे आदर्श विद्यार्थी बनले पाहिजे असे मोलाचं मार्गदर्शन श्री आझाद खान यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.शाळेतील मुलींना बौद्धिक, मानसिक, शैक्षणिक समस्यांबद्दल मार्गदर्शन करत तुमचे काही प्रश्न असतील तर प्रथम आई-वडिलां सोबत मोकळा संवाद साधा संवाद साधताना काही अडचणी येत असेल तर मोठी बहीण, मैत्रीण म्हणून माझ्या सोबत बोला असे सांगत प्रांजली ताई आत्राम यांनी मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले.अक्षर मानव अमरावती जिल्हा सचिव अश्विनी वितोंडे-खान यांनी 10 वी 12 वी च्या याच वयात योग्य ध्येय ठरवण्याचे वय असते. आपलं ध्येय ठरवून अतोनात मेहनत घेतली पाहिजे. कोणतेही काम करतांना कमीपणा वाटुन घेवू नका कुठलंही काम लहान-मोठ नसतं असे मोलाचं मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात ढोले सरांनी म्हटले की जे काम राजकीय लोकांनी केले पाहिजे ते काम अक्षर मानव संघटना करतं आहे. ‘निव्वळ माणूस म्हणून जगा’ हा संदेश खुप मोठा संदेश आहे. या विचाराच मला कौतुक वाटतं अक्षर मानव सारख्या संघटना समाजात असल्या पाहिजे. उपक्रम घेण्यासाठी आमची शाळा केव्हाही आपल्या साठी उपलब्ध आहे. ‘सुंदर आपलं हस्ताक्षर‘ या सारखा उपक्रम स्तुत्य उपक्रम आहे अक्षर मानवचा असे सांगत शाळेतील मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.विद्यार्थी संवाद, ओझोन दिवस, वर्धापनदिन निमित्ताने ओझोन जनजागृतीच्या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सर्व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक कु. अक्षरा चोपडे व कु. नीलम मोरेश्वर गोहते, द्वितीय क्रमांक – कु. पल्लवी कामतकर. भक्ती गीत गायन प्रथम क्रमांक कु. श्रावणी घागरे, द्वितीय क्रमांक चि. मयुर मेंढे या मुलांना वितरीत करण्यात आले.

प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजकुमार शंकरराव तिरभाने यांनी व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. नीलम मोरेश्वर व कु. प्रतिक्षा काळभुत यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली ठाकरे -ढोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री राजकुमार तिरभाने, मनिषा कामथे, निकिता गोरे, रामेश्वर डोंगरे, ईश्वर हिंगवे, युवराज किनकर, वैशाली ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.
