कुटासा मंडळातील शेतकरी चिंतेत, बँकेकडून कारवाईचा इशारा
अकोला /जिल्हा प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून सततच्या नापिकी आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कपाशीसह सोयाबीनसारख्या पिकांचे भावही खालावल्याने शेतकऱ्यांना पिककर्ज फेडण्यास अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरीही, कुटासा येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटीसा पाठवणे सुरू केले आहे.अन्नपूर्णा भगत, एक विधवा महिला शेतकरी म्हणतात, “माझ्या शेतात दोन वर्षांपासून पिक नाही. बँकेने नोटीस पाठवली, आता कर्ज कसे फेडणार.? पिक होईल का नाही याचीही शाश्वती नाही. अशी परिस्थिती चालू राहिली, तर माझ्यासारखे शेतकरी आत्महत्या करण्याची विचार करत आहेत.”

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, आधीच नापिकीमुळे उत्पन्न झालेले नाही, तसेच कर्ज भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे..यासंदर्भात. कुटासा येथिल महाराष्ट्र बँक चे मॅनेजर, यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता. तो होऊ शकला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही
“सततच्या नापिकी आणि कर्जाच्या नोटीशांमुळे शेतकरी धास्तावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. दुसरीकडे राज्यात गेल्या आठ महिन्यांत तब्बल 1 हजार 183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात पश्चिम विदर्भात सर्वात जास्त 707 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 520 शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले. ही आकडेवारी ऐकूनच हादरून जावं. पण सरकारला याची काही चिंता वाटत नाही..
सरकारने शासनाने त्वरित लक्ष देऊन, बँकेकडून नोटीसा पाठवणे बंद करावे..व सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल… आंदोलनांची तयारी सुरू केली आहे….
पूर्णाजी खोडके
विदर्भ विभागीय युवा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

सदर बँकेने अकोट न्यायालयात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर वसुलीचे केसेस दाखल केल्या आहेत, आपण ऑनलाईन पाहू शकता.