ना. संजय राठोड यांचे सह समाजातील विविध नेत्यांची उपस्थिती
मुंबई/ प्रतिनिधी
बंजारा समाजाचे आरक्षण, जातिनिहाय जनगणना, VJ-A प्रवर्गात होणारी घुसखोरी तसेच नॉन क्रिमीलेयरची अट रद्द करण्याबाबत या महत्त्वाच्या विषयांवर समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर आणि अभ्यासक यांची सातत्याने मागणी होत होती.या पार्श्वभूमीवर दिनांक 08 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतील चर्चगेट येथील IMC Hall येथे समाजाच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस महंत आमदार बाबुसिंग महाराज, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार निलय नाईक, मोहिनीताई इंद्रनील नाईक, महंत कबीरदास महाराज, महंत रायसिंग महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत सुनील महाराज, महंत यशवंत महाराज, महंत शेखर महाराज, डॉ. टी.सी. राठोड, शंकर पवार, अमर राठोड, प्रा. संदेश चव्हाण, प्रा. फुलसिंग जाधव, दिगंबर राठोड, प्रा. संजय चव्हाण, राजपाल राठोड, बळी राठोड, बी. के. नाईक, ज्योतिराम चव्हाण, आकाश जाधव, मोहन राठोड, धूपचंद राठोड, डॉ. कृष्णा राठोड, डॉ. बबन पवार, प्रकाश राठोड, धनराज राठोड, दत्ता राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

तसेच समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि राजकीय प्रतिनिधीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. समाजाच्या सर्व विषयांबाबत उपस्थितांचे मत ऐकून घेऊन ती मते मंत्रीमंडळ उपसमितीसमोर मांडण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

https://t.me/s/Top_BestCasino/137