माय भारतच्या युवक मंडळासोबत राज्य युवा धोरणाबाबत विशेष चर्चा सत्राचे आयोजन
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
नवीन युवा धोरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्यात युवा धोरण, २०१२ च्या आधारे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी एक नवीन समितीगठीत करण्यात आली आहे.ही समिती राज्य युवा धोरणाबाबत आपल्या शिफारशी शासनाला सादरकरणार आहे त्याबाबत भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माय भारत युवकमंडळाच्यावतीने विशेष चर्चा सत्राचेनुकतेच आयोजन करण्यात होते या बैठकीचीअध्यक्षता अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचेराष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संतगाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारीअधिकारी समितीचे विशेष निमंत्रित सदस्यडॉ. मनीष शंकरराव गवई यांनी केली.राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्ययुवा धोरणानिर्मिती होत असून राज्यातील युवकांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रमराबविण्यासाठी युवकांशी संवाद साधण्यासाठी युवा संवाद दौरा अंतर्गत याचर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी भारत सरकार क्रीडा व युवककल्याण विभागाच्या माय भारत जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर उपस्थित होत्या .या प्रसंगी महाराष्ट्र शासन राज्य युवा धोरण विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मनीष गवईयांचे जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकरयांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊनविभागाच्यावतीने स्वागत केले.अनेक वर्षांपासून राज्याच्यायुवकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम धोरणाची गरज होती. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२’ हे धोरण जाहीर केले होते. मात्र, १० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर हे धोरण सध्याच्या गरजांनुसार अपुरे पडू लागले होते. त्यामुळे, राज्याच्या युवा धोरणामध्ये सुधारणाकरून नवीन धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचारात होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याअध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्याबाबत गठीत युवाधोरण समितीची पहिली बैठक पार पडली.भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मायभारत कार्यालयात आयोजित बैठकीत युवक मंडळाच्या सदस्यांनी नव्या धोरणात शिक्षण, रोजगार, उद्योजकता, स्टार्टअप्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), बौद्धिक व सामाजिक विकास तसेचराष्ट्रप्रेम, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्वगुणांचीजोपासना याबाबींचा समावेश असावा अशा सूचना करण्यात आल्या .विकसित भारत 2047 च्यादिशेने वाटचाल करताना, नव्या पिढीच्या गरजांनुसार धोरण तयारकरणे आवश्यक असून शहरी व ग्रामीण भागांतीलयुवकांना समान संधी मिळाव्यात, यासाठी प्रशिक्षण, सुविधा व योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार करावे अशा सूचनादेण्यात आल्या . युवक मंडळाच्या सदस्यांनी या धोरणांतर्गत युवा प्रशिक्षण केंद्रे, वसतीगृहे, युवा निधी, पुरस्कार, महोत्सव, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम तसेच युवा प्रतिष्ठा निर्देशांक यांचासमावेश करण्यात यावा अशी देखील मागणी केली . डॉ गवई यांनी आपल्या मार्गदर्शनातयुवकांचे विचार आणि अपेक्षा समजून घेऊनच हे धोरण आखले जाईल . यासाठी शाळा, महाविद्यालये, सोशल मीडिया, सेवा क्षेत्रातील प्रतिनिधी यांनासहभागी करून त्यांच्या सूचनांचा धोरणात समावेश कर्नाय्त येई. धोरणात युवक कल्याण विभागाबरोबरच इतर विभागांनीहीसंघटितपणे आणि समन्वयाने काम करण्यात येईल.

.डॉ मनीष गवई यांनी राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठीराज्य युवा धोरणानिर्मिती होत असल्याचे देखील प्रतिपादन त्यांनी केले तसेच हे नवीन धोरण युवकांनाशिक्षण, रोजगार, क्रीडा, कौशल्य विकास आणि सामाजिक सहभागाच्यासंधी उपलब्ध करून देण्यास नक्कीच मदतकरेल. त्याकरिता राज्यातील युवकांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी युवकांशीसंवाद साधण्यासाठी युवा संवाद दौरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आलेलयाशिफारसींचा विचार करून राज्यातील युवकांच्या विकासाचे व्हिजन ठरविणारेराज्याचे युवा धोरण नवीन युवा धोरणाचामसुदा तयार करणार असून हे नवीन धोरण राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईलआणि युवकांना आत्मनिर्भर बनण्यास मदत करेल अशी आशा विशेष निमंत्रित समिती सदस्य डॉमनीष गवई यांनी व्यक्त केली . याप्रसंगीमाय भारत युवक मंडळाचे सुरज धर्मे,सतीश वाघमारे,भावेश येडकर,धीरज सावरकर,कांचन गवई,स्वराज घोरमाडे,सुरेंद्र वाघमारे,आकाश सोनोने उपस्थित होते बैठकीचेसंचालन लेख व कार्यक्रम सहायक अजिंक्य गवळी यांनी केले तर बैठकीचे समन्वयकविशुद्धानंद जवंजाळ, पंकज वानखडे उपस्थित होते.
