पीडितांचे अश्रू अन् पनवेलचा डान्सबार!
यवतमाळ /जिल्हा प्रतिनिधी
महाभारतातल्या संजयने आपल्या दिव्यदृष्टीने रणांगणाचे सत्य जसेच्या तसे धृतराष्ट्रासमोर मांडले होते. मात्र, यवतमाळच्या पत्रकारितेत स्वतःला मोठा मार्तंड समजणाऱ्या एका आधुनिक ‘संजय’ने दिव्यदृष्टीऐवजी केवळ ‘वसुलीची दृष्टी’ बाळगून संपूर्ण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला काळिमा फासला आहे. कधीकाळी रस्त्यावर पोत्यावर बसून वर्तमानपत्र विकणाऱ्या या स्वयंघोषित पत्रकाराने आता पीडितांच्या जखमेवर मीठ चोळून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा नवा गोरखधंदा सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पीडितांची लूट आणि डान्सबारची मौज
प्रशासन आणि पोलिसांकडून न्याय न मिळालेले अन्याय-अत्याचारग्रस्त नागरिक मोठ्या आशेने पत्रकारांच्या दारात येतात. मात्र, हा तोतया ‘माफीवीर संजय’ याच हतबल नागरिकांची लूट करत आहे. एका पत्रकार परिषदेचे (प्रेस) ‘पत्रकार कल्याण निधी‘च्या गोंडस नावाखाली चक्क २ हजार रुपये उकळायचा सपाटा याने लावला आहे. ज्याला स्वतःच्या हाताने साधी ‘निधनवार्ता’ नीट लिहिता येत नाही, तो स्वतःला पत्रकारितेचा भीष्म पितामह समजून उजळ माथ्याने खंडणीखोरी करत आहे.गोरगरिबांच्या अश्रूंतून आणि पिळवणुकीतून जमा होणारा हा काळा पैसा मुंबई-पनवेलमधील डान्सबारमध्ये छमछमवर उडवला जात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

दलाली आणि लाचारीचा कळस
खंडणीखोरीवरच हा भामटा थांबलेला नाही, तर स्वतःच्या कथित पदाचा वापर करून त्याने लाचारीचा नवा उच्चांक गाठला आहे. एका स्थानिक पत्रकार संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या मर्जीखातर हा स्वयंघोषित पत्रकार ‘बिछाने गरम करण्याची सेवा‘ पुरवण्याइतक्या खालच्या पातळीवर घसरला असल्याची जोरदार चर्चा सध्या यवतमाळच्या वर्तुळात रंगली आहे.सत्याचा गळा घोटणाऱ्या आणि पत्रकारांच्या नावावर काळाबाजार करणाऱ्या या विकृत ‘संजय‘च्या कृत्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात यवतमाळच्या स्वाभिमानी पत्रकारितेची मान शरमेने खाली गेली आहे. या खंडणीखोर दलालावर पत्रकार संघटना काय चाप लावणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे
