हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अमर रहे अमर रहे
पापळ /प्रतिनिधी
मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आयुष्यभर ठामपणे आवाज उठवणारे अखंड हिंदुस्तानचे कवच कुंडल हिंदुरुदय सम्राट आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक जीवनातील प्रभावी व्यक्तिमत्व होते.
आपल्या रोखठोक वकृत्वाने स्पष्ट विचारांनी आणि नेतृत्व गुणांनी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतंत्र ठसा उमटवला अशा या महामानवाच्या दिनांक 17 नोव्हेंबर स्मृतिदिनी पापड येथील शिवसेना शाखा पापड व तालुका कार्यकारिणीच्या वतीने श्री शंकर देवस्थान पापड येथील प्रांगणात भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्वांनी हिंदुरुदय सम्राट माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हारार्पण व पुष्प वाहून आदरांजली अर्पण केली याप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांनी तथा ज्येष्ठ नागरिक व युवकांनी जय भवानी जय शिवाजी व हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब अमर रहे अमर रहेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

यावेळी या कार्यक्रमाला शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीपराव डोईफोडे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख नंदकिशोर इंगळे ज्येष्ठ नागरिक रामदासजी खंडाळकर,दर्याव सिंगजी बयस., चेतन डोईफोडे अशोकराव कसले गजानन शिरभाते रोशन गुल्हाने शंकर भोयर शुभम चौधरी राहुल म्हात्रे शरद सोनवणे ऋषिकेश तिवाडे कान्तेश्वर सोनोने श्याम इंगळे रोशन सोनोने विकी सोळंके गणेश खरीपकार सागर पोच्ची रामेश्वर साखरकर ललित तायडे गौरव कथले सौरव कथले स्वप्निल रिठे अशोकराव गोरले अनिल गडेकर भास्कर पोहेकर याच्यासह असंख्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
