नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
दिवसभर चैत्राच्या वणव्यात एक एक दाणा गव्हाच्या उंब्या वेचून जमा करून किवा एक एक गाठा हरबर्याचा जमा करून त्याला अतिशय पद्धतशीर पने साफ सफाई, मळणी करून जमा केले दाणे म्हंजे सरवा. कापणीनंतर शेतात उरलेले किंवा पडून राहिलेले पिकाचे दाणे,वेचणे होय.पूर्वी शेतातील गहू हरभरा इतर धान्याची कापणी झाल्यानंतर पिकाच्या अवशेषांमधून दाणे गोळा करणे सरवा विशेषता मजूर महिला करीत असत.शेतातील काढणीनंतर मागे राहिलेले पीक वेचणे त्यातील काही भाग शेतमालकास देऊन उरलेले धान्य सरवा घरी नेत.गव्हाच्या ओंब्या, ज्वारीचे कणसे शेंगा किंवा कडधान्ये जमिनीत राहिल्यास त्या जमिनीत पडून राहिल्यापेक्षा कुणीही पोटाने खावे हा दृष्टिकोन शेतकऱ्याचा असायचा. पूर्वी शेतमजुराची हलाखीची परिस्थिती असल्याने सरवा ही प्रक्रिया कष्टाची असूनही उन्हात रानात भटकून दाणे गोळा केले जायचे.

सरवा ही अनेकदा कष्टकरी महिलांच्या जीवनाशी जोडलेली असते, ज्या तहान-भुकेची पर्वा न करता, कडक उन्हात शेतात पिकाचा प्रत्येक दाणा गोळा करयच्या. सरवा जो असतो ती गव्हााची ओंबी किंवा जो गाठा असतो तो साधारणता पूर्ण शेता मध्ये जे पीक असते त्याला जे थोड अगोदर लागते ती ओंबी, गाठा सर्वसाधारण शेतातील पीका पेक्षा आकाराने थोडा मोठा असतो. ग्रामीण भाषेत त्याला वायफुल सुद्धा म्हणतात त्या पासून सहसा ते निर्मित असते त्या मुळे ते सर्वसाधारण पिका पेक्षा थोड पहिले पक्व होते गळते. ग्रामीण भाषेत त्याला इरते अस म्हणतात म्हणूनच ते जमिनीवर सांडते. त्यातील दाना आकारणे थोडा टप्पोरा असतो. तो वेचनाऱ्यास सहज दिसतो पण एक.. एक गाठा.. किंवा उम्बी उन्हात वेचने फार जिक्रीचे काम आहे पण गरजे पोटी ते मजूर. महिला.. आपल्या लहान मुलांना सुद्धा सोबत घेऊन करतात.सर्व पासून मिळालेले धान्य महिला ग्रामीण भागतील पारंपरिक वाहिवट जसे गहु ओलवून शेवळ्य, गव्हाचे भिजून त्याला योग्य प्रकारे आंबून चिकाच्या कुरोड्या अशे एक ना अनेक प्रकार करायच्या पण आजच्या घडीला अन्नाची कोणतीच टंचाई नसल्याने सर्व गोष्टी पैश्यात मोजण्याचे सवयी मुळे आता कुणी सर्वा पण वेचत नाही.
सर्वांची परिस्थिती बऱ्या स्थितीत असून शासनाकडून मिळणारे मोफत धान्य यासह इतर आर्थिक मोबदला मिळत असल्याने शेतमजुरांनी सर्व व्यसनाकडे पाठ फिरवली. हजारो टन धान्य जनावराच्या खाण्यात किंवा जमिनीत गाडल्या जाते. कालाय तस्मे नमः काळाचा महिमा दुसरे काय.
नितीन दुर्बुडे, शेतकरी
