प्रथमच शासकीय स्तरावर जयंती; संतांच्या विचारांचा जागर पत्रकारांकडून अभिवादन
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
युवा ग्रामीण पत्रकार संघ,नांदगाव खंडेश्वरच्यावतीने आज शासकीय विश्रामगृह येथे संत गुलाबराव महाराज यांची जयंती श्रद्धापूर्वक व उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा संत गुलाबराव महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर प्रथमच साजरी करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.यावेळी संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित पत्रकारांनी संत गुलाबराव महाराज यांच्या सामाजिक, आध्यात्मिक, ज्ञानपर आणि मानवकल्याणाच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजाने आदर्श घ्यावा,असे मत व्यक्त केले.युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने संत गुलाबराव महाराज यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या विचारांचा प्रसार करून समाजात सामाजिक सलोखा, ज्ञान आणि सेवाभावाची प्रेरणा रुजविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे, श्रीपाल सहारे, पवन ठाकरे, पवन इंगोले तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
