नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माऊली देवी ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती हे गाव अमरावती यवतमाळ मार्गावर अमरावती वरून फक्त २३ कि.मी अंतरावर असून साधारणता तीन हजार लोकसंख्या असून येथे पुरातन ४००वर्ष पूर्वीचे श्री. अंबादेवी अंबिका भवानी नाव असलेले पुरातन मंदिर आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार साधारणता १९८७ मध्ये सुरुवात झाली आज तगायत मंदिराची लोक सहभागामधून काम जनतेच्या भावीकभक्तांच्या आर्थिक श्रमिक मदतीने हळूहळू पूर्णत्वास जात आहे अशातच मंदिराला ‘क’ दर्जा प्राप्त झाल्यामुळे तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मंदिराचे कामाला सुद्धा मदत झाली गावांमध्ये प्रवेश करताच जळू नदीला प्रारंभ होतो त्याच दरम्यान येथे नदी तीरी शंभू महादेवाचे मंदिर आहे तसेच नदीतीरी दुर्मिळ भक्त पुंडलिक महाराजांचे मंदिर सुद्धा आहे श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आहे त्याचप्रमाणे मुख्य मंदिर म्हणजे रामभक्त श्री.हनुमान मंदिर सुद्धा आहे १९५६-५७ मध्ये श्री.संत कर्मयोगी गाडगे महाराज सुद्धा स्वर्गीय पुंडलिक बाबा स्वर्गीय अरविंदराव चोरे यांचे शेतामध्ये आले निसर्गरम्य वातावरण पिंपळ वृक्ष वटवृक्ष मोठ्या डौलाने उभे राहत आहे मंदिरामध्ये दरवर्षी नवरात्र महोत्सव चैत्र महोत्सव श्री.संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यामध्ये भाविक भक्तांच्या सहकार्याने महाप्रसाद सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो आई अंबा मातेचे भक्तगण आणि त्यांचे कुलदैवत असणारे भक्तगण मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात येथील स्वयंभू असलेल्या पाच देवी बहिणी असून अमरावतीची अंबादेवी माहुरची रेणुका माता वणीची सप्तशृंगी देवी कोल्हापूरची महालक्ष्मीदेवी अशी आख्यायिका आहे त्यामुळे मंदिराला तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आहे सर्व लोक ग्रामस्थ येथे आनंदाने गुण्यागोविंदाने राहतात एकमेकांच्या सुखदुःखामध्ये भाग घेऊन संकटकाळी हाकेला ओ देतात त्यामुळे गावामध्ये शांततेचे वातावरण निर्माण झालेले आहे गावामध्ये ग्रामपंचायत पूर्व माध्यमिक शाळा इंग्रजी शाळा बँक तलाठी कार्यालय दवाखाना अशा सुख सोयी असलेले गाव हे माऊली चोर देवी गाव आहे तेव्हा आता दिनांक 11.10.2026 ते 20.10.2026 पर्यंत नवरात्र महोत्सव होत आहे त्यामध्ये श्रीमद् भागवत पठण भजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे श्री. हरिभक्त परायण श्री. त्रंबकराव बाभुळकर महाराज यांच्या वाणीने श्रीमद् भागवत ग्रंथाचे पठण होत आहे तेव्हा सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेंद्र रामरावजी सरोदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
