श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचे सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन.
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
श्री परमहंस परशराम महाराज सेवाधारी परिवार, जळतापूर/पिंपळोद यांच्या वतीने रविवार दिनांक ७ जून २०२६ रोजी श्रीक्षेत्र शेगाव येथे भव्य सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचे पारायण सकाळी ८.३० वाजता सुरू होणार असून हा ऐतिहासिक सोहळा श्री माहेश्वरी भवन, एसटी स्टँड समोर, शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे संपन्न होणार आहे.या धार्मिक व ऐतिहासिक सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच आदल्या दिवशी येणाऱ्या भक्तांसाठी शनिवार दिनांक ६ जून २०२६ रोजी श्री माहेश्वरी भवन येथे निवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.सोहळ्याचे आयोजन श्री परमहंस परशराम महाराज सेवाधारी परिवार, जळतापूर/पिंपळोद यांच्या वतीने करण्यात आले असून विविध भागांतील सेवाधारी व समाजबांधव या आयोजनात सक्रिय सहभाग घेत आहेत.आयोजक सेवाधारी म्हणून श्री जयंत सुरेशराव वानखडे (खामगाव/अमरावती), श्री गोकुळभाऊ शेगोकर (आकोट), श्री शंकरराव खवले (लोखोंडा), श्री शरदराव देवरणकर (अध्यक्ष, शैव गुरव हितकारणी मंडळ, अमरावती), श्री जयंत पुसदकर (निळकंठेश्वर संस्था अध्यक्ष, अमरावती), श्री भालचंद्रराव कथलकर (अंतरगाव गुरव), श्री राजूभाऊ कथलकर, श्री अशोकराव भारसाकळे, श्री प्रशांतभाऊ देशमुख, श्री परशरामभाऊ डोरस, श्री पुरुषोत्तमराव खंडार, श्री सुरेशराव रोहनकर, श्री कैलासराव डांगे, श्री शुभमराव पुसतकर, श्री ओमभाऊ मोरे, श्री मोहनराव पंडीत, श्री दिपकराव राजनकर, श्री संतोषराव दुत्तोंडे, श्री अशोक आगरकर, श्री चंद्रकांतराव पुसदकर, श्री दत्ताभाऊ कापसे, श्री सचिनराव चौधरी, श्री गणेशराव भांडे, श्री सचिनराव आरोकर, श्री संदीप राजूरकर, श्री हरिहरराव तांबस्कर, श्री प्रभाकर शेगोकर, श्री महेंद्रपाटील कथलकर, श्रीरामशंकर जयस्वाल, श्री दिलीपभाऊ बेलबागकर, श्री मनोजराव तायडे, श्री राजूभाऊ पुसतकर, श्री दत्ताभाऊ शिंदे, श्री अनिल निहाटकर व श्री नारायणराव डांडगे हे विशेष परिश्रम घेत आहेत.तसेच ज्या भक्तांकडे महाराजांचा महिमा ग्रंथ उपलब्ध नसेल त्यांनी श्री जयंत सुरेशराव वानखडे व श्री गोकुळभाऊ शेगोकर यांच्याशी संपर्क साधावा. ग्रंथाची किंमत १५० रुपये ठेवण्यात आली असल्याची माहिती आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.या पारायण सोहळ्यासाठी भाविकांनी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन आयोजक मंडळाच्यावतीने जयंत वानखडे मोबाईल नंबर 97 63 72 91 31 करण्यात आले आहे.
