अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे गौरव; तरूण उत्साही दुर्गोत्सव मंडळाचाही सन्मान
नांदगाव खंडेश्वर येथे सोहळा संपन्न
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘आदर्श गणेशोत्सव व दुर्गोत्सव स्पर्धा २०२६’ अंतर्गत, मंगरूळ चवाळा येथील लयभारी गणेशोत्सव मित्र मंडळाला पोलीस स्टेशन मंगरूळ चवाळा तर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशमंडळाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
हा गौरव सोहळा आज, सोमवार दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस स्टेशन, नांदगाव खंडेश्वर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राप्तीताई मारोटकर, नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार आनंद पिंजरकर, मंगरूळ चवाळाचे ठाणेदार अमोल तुळजेवार आणि लोणी टाकळीचे ठाणेदार मनोज धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन कवच’ मोहिमेला आणि पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध उत्सवाच्या आवाहनाला लयभारी गणेशोत्सव मित्र मंडळाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्सवादरम्यान उत्कृष्ट कायदा व सुव्यवस्था, ध्वनीप्रदूषणमुक्त व सुरक्षित मिरवणूक (नो डॉल्बी व पारंपारिक वाद्यांचा वापर), सामाजिक प्रबोधन व सलोखा तसेच ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत जनजागृती या निकषांवर मंडळाने सर्वोत्तम कामगिरी बजावली.या उल्लेखनीय कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंडळाचे मुख्य व्यवस्थापक मनोज गावनेर, अध्यक्ष गौरव गुल्हाने, उपाध्यक्ष आदित्य कुकडे, सचिव राहुल सुरजूसे, सहसचिव विशाल ढोकने आणि कोषाध्यक्ष कुणाल अवझाडे, उमंग गावनेर, सागर बुधले यांना पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

इतर पुरस्कार विजेते मंडळे
याच सोहळ्यात मंगरूळ चवाळा पोलीस ठाणे हद्दीतील इतर उत्कृष्ट मंडळांचाही सन्मान करण्यात आला:
• गणेशोत्सव स्पर्धा: कलाविर गणेश मंडळ (मंगरूळ चवाळा) यांना द्वितीय पारितोषिक, तर विघ्नहर्ता गणेश मंडळ (पळसमंडळ) यांना तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
• दुर्गोत्सव स्पर्धा: उत्कृष्ट सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव २०२६ अंतर्गत तरुण उत्साही दुर्गादेवी मंडळ (फॉरेस्ट नाका, मंगरूळ चवाळा) यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला पोलीस कर्मचारी, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, तसेच गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळाचे सतिश शिंदे, सागर गावनेर, रोहित राऊत, उदय चरपे, अक्षय वारकर, आदित्य पैठणकर, दिपराज झोपाटे, उमेश केवट, मनिष धामणकर, राज अवझाडे, नारायण सरोदे, हितेश गावनेर, शुभम गुल्हाने, सुमित बुधले, युवराज सुरजूसे, आकाश ढोकने, तेजस तांबटकर, आकाश भवरे, पंकज चरपे, अनिकेत गुल्हाने, नितिन बिसने, अजय भागवत, श्रेयस गंधे, अनुज राऊत, यश वारकर, प्रथमेश पंचबुद्धे, अमोल तिरमारे, रोहित सालोडकर आणि अजय निंबर्ते यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी सर्व पुरस्कार विजेत्या मंडळांचे अभिनंदन करत भविष्यातही असाच सामाजिक आदर्श जपण्याचे आवाहन केले.
