कोंडेश्वरच्या २५ कोटींच्या विकासकामांना गती
माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
अंजनगाव बारी ( पवन इंगोले)
ब वर्ग तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र कोंडेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत मंजूर करण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा दि.३० रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष तथा आमदार रवी राणा यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी माजी खासदार सौ. नवनीत रवी राणा, श्री क्षेत्र कोंडेश्वर संस्थानचे पदाधिकारी, सरपंच, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्याने आणि आमदार रवी राणा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निधीतून योग भवन, उद्योग भवन सभागृह, गणेश भवन, शंकर-पार्वती संकुल, प्राथमिक आरोग्य केंद्र यांसह विविध पायाभूत सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे कोंडेश्वर तीर्थक्षेत्राचा धार्मिक, पर्यटन व सामाजिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

नवनीत राणा यांच्या कार्याचा गौरव
कार्यक्रमात बोलताना आमदार रवी राणा यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्या अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. “जर नवनीत राणा पुन्हा निवडून आल्या असत्या, तर डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्यानंतर अमरावती जिल्ह्यातून दुसऱ्या कॅबिनेट मंत्री झाल्या असत्या. याची खंत संपूर्ण जिल्ह्याला आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात अमरावती जिल्ह्यातील विविध प्रश्न केंद्र शासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचेही आमदार रवी राणा यांनी नमूद केले. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा मंजूर करून घेण्यासाठी तसेच बेलोरा विमानतळाच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंगसह पायलट ट्रेनिंग
बेलोरा विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच येथून नाईट लँडिंग सुविधा, मुंबई-पुणे विमान फेरी तसेच पायलट ट्रेनिंग सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. पायलट ट्रेनिंगमुळे सुमारे दोन ते अडीच हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कोंडेश्वरच्या विकासाला नवी दिशा
२५ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांमुळे श्री क्षेत्र कोंडेश्वरच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासालाही गती मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमास श्री क्षेत्र कोंडेश्वर संस्थानचे अध्यक्ष रमेश पकडे, उपाध्यक्ष सुरेश टेटू, सहसचिव सुरेंद्र बारापात्रे, कोषाध्यक्ष परफुल वाठ, विश्वस्त रामकृष्ण लांडोरे, वीरेंद्र वासू चेकुले, आशिष अग्रवाल, प्रमोद राजनकर, प्रविण दातीर, देविदास बांडाबुचे, किशोर अंबाडकर यांची उपस्थिती होती.यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, सभापती ॲड. प्रीती हर्षल रेवने, नगरसेवक अजय जयस्वाल, प्रशांत वानखडे, किशोर जाधव, संजय हिंगलासपुरे, दीपक सम्राट, विजयभाऊ, नगरसेविका सुमतीताई ढोके, रांजणी डोंगरे, नंदाताई मेघवानी, प्रियंका भूषण पाटणे, पांडेताई, समाजसेवक लपीशेठ उर्फ चंद्रकुमार जाजोदिया, ह.भ.प. ॲड. सागर महाराज देशमुख, तसेच अमरावती तालुका अध्यक्ष अजय घुले उपस्थित होते.अंजनगाव बारीच्या सरपंच/ प्रशासक सौ. शोभाताई खडसे, उपसरपंच अरविंद निंबर्ते, कस्तुरा मोगरा येथील सरपंच सुधाकर काळे, वडगाव जिरेचे उपसरपंच अरुण मळगे, पार्डीचे सरपंच अक्षय मेश्राम, भानखेडा येथील उपसरपंच विनोद बंडाबुचे, नानाभाऊ इंगोले, प्रमोद निचत, बंडूभाऊ डकरे, शरद इंगोले, प्रवीण टवलारे, ओंकार मोहोळ, करमनभाऊ, सौ. कांताबाई राठोड, नंदाताई सावदे, आनंद वारी, सुनील निचत, दिनेश टेकाम, जगदीश अंबाडकर, महेश मूलचंदानी, प्रशांत वानखेडे, नितीन बोरकर, आशिष गावंडे, समाधान वानखेडे, सुनील राणा, आशीष कावरे, राजू हरने, देवानंद राठोड, उमेश ढोणे, शुभम उंबरकर यांच्यासह परिसरातील भाविक भक्त, नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री क्षेत्र कोंडेश्वरच्या विकासासाठी मंजूर झालेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विविध कामांमुळे तीर्थक्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, आगामी काळात कोंडेश्वर हे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकसित होण्यास मदत होणार आहे.
