नशामुक्त युवा निर्माण करणे हा माझा संकल्प -डॉ. मनीष गवई
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी )
अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ. मनीष शोभा शंकरराव गवई यांना राजनीती की पाठशाला,राष्ट्रीय युवा मंचाच्या वतीने दिला जाणारा युवक कल्याण क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठीचा राष्ट्र युवा गौरव पुरस्कार देऊन नुकतेच नवी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या विशेष सभागृहात आयोजित समारंभात सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे या समारंभात त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन देखील करण्यात आले हे विशेष.या प्रसंगी नशामुक्त युवा निर्माण करणे हा माझा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अजय पांडे संस्थापक,राजनीती कि पाठशाला उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे श्री रामदास आठवले, केंद्रीय राज्य मंत्री, सामाजिक न्याय एवं अधिकारिता, भारत सरकार, श्री प्रताप जाधव जी, केंद्रीय राज्य मंत्री, आयुष मंत्रालय, भारत सरकार,श्रीमती किरणताई महल्ले सदस्य राष्ट्रीय ओबीसी आयोग भारत सरकार,श्री किशोर मकवाना अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग, भारत सरकार,श्री करम सिंह कर्मा सदस्य राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, भारत सरकार, शिवसेना समन्वयक श्री अभिषेक वर्मा ,शिवसेनेचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष संदीप चौधरी उपस्थित होते. युवकांना सशक्त करण्याच्या उद्देशाने दिल्या जाणाऱ्या राष्ट्र युवा गौरव पुरस्कारासाठी यावर्षी अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्याना हा सन्मान नवी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथील आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूप सन्मानपत्र, स्मुर्तिचिन्ह,पदक, शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे या समारंभात त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन देखील करण्यात आले अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांनी युवक कल्याण क्षेत्रातील विधायक कामगिरी केली आहे. युवा विकास क्षेत्रात डॉ.गवई यानी समाजासमोर तरुण पिढीला नवचेतना प्रदान करण्याचे काम केले आहे. युवकांना सशक्त करण्यासाठी देशभर व देशाच्या बाहेरही जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. गवई यानी युवकांना सशक्त करण्याचे काम केले आहे. स्वतः ते सार्क संघटनेचे युवा दूत म्हणून कार्य करीत आहे सार्क देशातील युवकांशी त्यानी संवाद साधला असून मैत्रीचा संदेश दिला आहे.डॉ गवई यांच्या माध्यमातुन अमरावतीच्या मातीलाराष्ट्रीय पातळीवर देशाच्या युवकांचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. अशा प्रकारच्या पुरस्काररसाठी अमरावतीच्या युवकाची निवड होणे ही अमरावतीसाठी गौरवाची बाब आहे. विशेष बाब म्हणजे त्याना युवक कल्याण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सहा अंतर्राष्ट्रीय, एकविस राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत ज्यात त्याना आंतरराष्ट्रीय यूथ लीडरशिप अवार्डने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या भरीव कामगिरीसाठी त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे.आपल्या सत्काराला उत्तर डॉ. मनीष गवई म्हणाले कि युवक कल्याणासाठी माझे आयुष्य समर्पित असून युवकच देशातील विकासाचे चित्र बदलू शकतो. देश विकासामध्ये युवकांचा सहभाग फार महत्वपूर्ण असतो त्यामुळे युवकाना विधायक दिशा प्रदान करणे महत्वाचे आहे आणि भविष्यातील सक्षम देश निर्मिती देखील युवकांच्या माध्यमातून होते. युवा शक्ती ही देशाची सकारात्मक ऊर्जा असून या उर्जेला नवं आयाम प्रदान करणे काळाची गरज आहे नशामुक्त युवा निर्माण करणे हा माझा संकल्प असून यासाठी मी माझे आयुष्य समर्पित करणार आहे अमरावतीच्या कर्मभूमीने मला अंतर्राष्ट्रीय स्तरापर्यंत पाठविले त्यामुळे अमरावतीच्या मातीचे देखील मी ऋणी आहे असे प्रतिपदानही त्यांनी केले. डॉ. मनीष गवई यांनी आपला हा सन्मान आपल्या आई- वडिलांना समर्पित केला असून अमरावतीकरांचे विशेष आभार देखील मानले.
