म्हसला येथे रवींद्र मेटकर यांच्या प्रयोगशील प्रोल्टी फाॅर्मची पाहणी..
विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दि.१५ म्हसला येथील रवींद्र मेटकर यांच्या यशस्वी व प्रयोगशील कुक्कुटपालन ( प्रोल्टी फाॅर्म ) प्रकल्पाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. उत्पादनक्षमता, आधुनिक पद्धती आणि व्यवस्थापनाच्या बारकाव्यांचा आढावा त्यांनी घेतला.

या क्षेत्रभेट कार्यक्रमात
उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, आत्मा संचालक अर्चना निस्ताने, तलाठी लांजेवार तसेच दिलीप मेटकर आणि शिवराय मेटकर उपस्थित होते. शाश्वत शेती व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने यावेळी सामूहिक वृक्षारोपणही करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा सत्कार करण्यात आला.
