पत्रकार बांधवांकडून बाबासाहेबांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
नांदगाव खंडेश्वरात बाबासाहेब जयंतीला पत्रकारांचा ‘एकात्म जयंती उपक्रमाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
येथील शासकीय विद्यामगृह, नांदगाव खंडेश्वर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात व श्रध्देपूर्वक साजरी करण्यात आली.सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून प्रतिमेचे पूजन, हारार्पण तसेच केक कापून जयंती साजरी करण्यात आली.

पत्रकार बांधवांनी एकत्र येत महामानवांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली व त्यांच्या विचारांना व अभंग योगदानाला वंदन करण्यात आले. ग्रामीण भागातील पत्रकारांकडून आयोजित हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.यावेळी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव ब्राह्मणवाडे, नितेशजी कानबाले,श्रीपाल सहारे, अवधुत गाडेकर,देवीदास गाडेकर, पवन ठाकरे,गजेंद्र ढवळे, सुरज सहारे,पवन इंगोले उपस्थीत होते.जयंती कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, बंधुता, समानता आणि शिक्षण या बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांची पुनः स्मरण करण्यात आली. पत्रकारांनी समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करत राहण्याचा संकल्पही व्यक्त केला.
