केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांचे मानले विशेष आभार, अमरावतीच्या मानात भर
हिंदुस्थान स्काऊट गाईडसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणार-डॉ. मनीष गवई
अमरावती- (जिल्हा प्रतिनिधी)
हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड्स ही तरुणांमध्ये नेतृत्व, सांघिक कार्य आणि सेवाभावाची भावना रुजवणारी क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाची मान्यताप्राप्त एक स्वयंसेवी संघटना आहे देशभरातील युवा कल्याण कार्यक्रमाबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणी करण्याकरिता हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड्सची निर्मिती करण्यात आलीं असून या मध्ये अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मनीष शंकरराव गवई यांची निवासी आयुक्त पदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या विशेष निवडीसाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांची सामाजिक तथा युवक कल्याण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर वरील भरीव कामगिरीला पाहून ही निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी डॉ केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री मनसुख मांडवीय यांचे विशेष आभार मानले.डॉ गवई यांच्या निवडीने अमरावतीच्या मानात भर पडली असून हिंदुस्थान स्काऊट गाईडसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे डॉ. मनीष गवई यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्तान स्काउट्स अँड गाईड्स हे एक स्वयंसेवी, गैर-राजकीय आणि शैक्षणिक युवा आंदोलन आहे, जे तरुणांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी काम करते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवा भावना रुजवणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. देश भरातील तरुणांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन विशेष युवा कल्याण कार्यक्रम तयार करणे, सरकारला ला सूचना करणे हे महत्वपूर्ण कार्य हे संघटन करते राष्ट्रस्तरीय दर्जा प्राप्त संघटने मध्ये अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष शंकरराव गवई यांची निवड ही त्यांची सामाजिक तथा युवक कल्याण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर वरील भरीव कामगिरीला पाहून करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून त्याना युवकांच्या विकासकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे केंद्र शासनाला आराखड़ा तथा सूचना, युवा कल्याण धोरणाबाबत सूचना सादर करता येणार आहे. विशेष म्हणजे हे संघटन क्रीडा व युवक कल्याण मंत्रालया द्वारे मान्यता प्राप्त असून ही संघटना विश्व स्वत्रंत स्काऊट फेडरेशनची सदस्य देखील आहे या संघटनेचा थेट देशभरातील सर्व विध्यार्थ्यांशी संपर्क येणार असून यामध्ये युवा विकासाबाबत समन्वय साधण्याची महत्वपूर्ण जबाबदारी डॉ. मनीष गवई निभावणार असून हिंदुस्थान स्काऊट गाईडसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . युवा कल्याण क्षेत्रात डॉ.गवई यानी समाजासमोर तरुण पिढीला नवचेतना प्रदान करण्याचे काम केले आहे. युवकांना सशक्त करण्यासाठी देशभर व देशाच्या बाहेरही जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. गवई यानी युवकांना सशक्त करण्याचे काम गेल्या अनेक वर्षपासून करीत आहे. युवकांमधे राष्ट्रप्रेम,सर्वधर्म समभाव,विश्व शांति करीता युवा विचारप्रणाली करीता अंतर्राष्ट्रीय पातळवर देखील या विषयाला घेऊन त्यानी युवा शक्तिकरणाबाबत प्रभावी कार्य केले असून त्यांनी राष्ट्रबांधणीत – राष्ट्रविकासात युवकाचा सहभाग, युवा सह-विचार आदान प्रदान, विश्व मैत्री करीता युवा विचारांची गरज यावर प्रकाश टाकला आहे. तसेच देशाच्या विकासात युवकांची भूमिका यावर सार्क देशात भक्कम बाजू मांडली आहे. युवकांना जागृत करण्यासाठी त्यानी अनेक सामाजिक उपक्रमांचे व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे. स्वतः ते सार्क संघटनेचे युवा दूत म्हणून कार्य करीत आहे सार्क देशातील युवकांशी त्यानी संवाद साधला असून मैत्रीचा सदेश दिला आहे. डॉ गवई यांच्या माध्यमातुन अमरावतीच्या मातीला राष्ट्रीय पातळीवर देशाच्या युवकांचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. आशा प्रकारच्या संघटनेमधे अमरावतीच्या युवकाची निवड होणे ही अमरावतीसाठी गौरवाची बाब आहे. विशेष बाब म्हणजे त्याना युवक कल्याण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सहा अंतर्राष्ट्रीय, एकविस राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत ज्यात त्याना आंतरराष्ट्रीय यूथ लीडरशिप अवार्डने देखील सनमानित करण्यात आले आहे. त्यांच्या भरीव कामगिरीसाठी त्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या या विशेष निवड़ीसाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. पुन्हा एकदा डॉ. मनीष गवई यांच्या रूपाने अमरावतीचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.
