अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
दिनांक 8 मार्च रोजी हातूर्णा पुनर्वसन येथे शिवजयंती उत्सव निमित्त व्याख्यान आणि महिला दिनाच्या औचित्य साधून प्रेरणादायी महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच युग अभ्यास अकॅडमी आयोजित 19 फेब्रुवारी तारखेनुसार शिवजयंती साजरी करून विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण सुद्धा या कार्यक्रमांमध्ये करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघ जिल्हा सचिव संजय भाऊ ठाकरे, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष मयूर भाऊ विघे, गजानन भाऊ ठाकरे, गावातील पोलीस पाटील, माझी सरपंच वर्षाताई तायडे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण भाऊ अठोर , सचिन भाऊ कावरे, अनिल भाऊ तायडे, तसेच व्याख्याता आराध्या गजानन ठाकरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर भूषण राव माने, सुभाष राव माने, महेंद्र भाऊ कदम सचिन भाऊ जाधव, सुशील भाऊ इंगळे,अनिल भाऊ हिवराळे,हे मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन करून जिजाऊ वंदना करण्यात आली तसेच प्रमुख अतिथींनी आपला परिचय तिला आणि कार्यक्रमाला शुभेच्छा देणे व्याख्यानाला सुरुवात झाली ही बाल व्याख्याता आराध्य ठाकरे यांनी उत्कृष्ट असे व्याख्यान दिले 18 पगड जाती यावर व्याख्यान दिले महाराजांचे विचार हे आचरणात आणणे किती महत्त्वाचे आहेत हे तिच्या व्याख्यानातून सर्वांना कळले तसेच विशेष प्रेरणादायी गावातील सन्मान हा मोनाली ताई तायडे यांचा करण्यात आला, सुशीला ताई जाधव, मंगलाताई अठोर, मायाताई अठोर , निर्मलाताई मेहेरे, चित्राताई गौरकर, सविताताई बनसोड, यांचे गावामधून प्रेरणादायी महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर तसेच विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

रंग भरणा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आराध्य संतोष ओलीवकर, द्वितीय क्रमांक तन्वी विवेक अठोर, तृतीय क्रमांक कंनक प्रदीप शिंगारे. असेच चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक मध्ये नंदिनी रवींद्र माने, द्वितीय क्रमांक अनन्या रवींद्र माने, तृतीय क्रमांक स्वाती गणेश कुरवाडे, तसेच निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी विजय ओलीवकर, द्वितीय क्रमांक उन्नती रामानंद उद्दीमकर, तृतीय क्रमांक सन्य योगेश वानखडे, प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी विजय ओलीवकर, द्वितीय क्रमांक ऋतुजा मंगेशकर अठोर , तृतीय क्रमांक रोशनी हरिभाऊ उदिमकर, असा उत्कृष्ट कार्यक्रम आमच्या गावामध्ये हातुर्णा पुनर्वसन येथे प्रथमच घेण्यात आला आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व गावकरी मंडळ आणि विद्यार्थी वर्ग त्यांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे आयोजन राहुल भाऊ माने, ओम भाऊ टोळे , नितेशभाऊ रडके, पूजाताई रडके या सर्व टीमने मिळून कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन यांनी केले.
