गिरगांव चौपाटि येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे अध्यक्ष सागर समुद्रवार यांचे आवाहन
अमरावती/ उत्तम ब्राम्हणवाडे
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कलाल-कलार समाजावर होत असलेला सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी व कलाल-कलार समाजातील प्रलंबित प्रश्न कित्येक वर्षापासून रखडलेले आहेत ते पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना अध्यक्ष सागर समुद्रवार सरचिटनीस संतोष खंबलवार कार्याध्यक्ष रविद्र हटवार प्रवक्ता रमेश लांजेवार महिला अध्यक्ष सौ सिमा खंबलवार मराठवाडा अध्यक्ष संजय हिवाळे विदर्भअध्यक्ष संजय हटवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत अरबी समुद्र गिरगांव चौपाटि येथे जलसमाधी आंदोलन करण्याचे आयोजन केल आहे कलाल कलार समाजातील प्रमुख प्रश्न राज्यात भगवान सहस्त्रबाहु अर्जुन यांच्या नावाने आर्थिक तरतुद असलेले महामंडळ स्थापन करण्यात यावे.
लाडवाणी सुंगधि तेलंग यांना कलाल254 मध्ये सामाविष्ट करून ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यात यावे.
कलाल-कलार समाजाचा व्यवसाय मद्य विक्रि जो हस्तांतरित केला आहे तो परत करावा किंवा कलाल-कलार समाजातील लोकांना दारू परवाने ऊपलब्ध करुन देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटना अरबि समुद्र गिरगांव चौपाटि मुंबई येथे जलसमाधी आंदोलन करणार आहे हजारो च्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान संघटनेचे अध्यक्ष सागर समुद्रवार सरचिटणीस संतोष खंबलवार कार्याध्यक्ष रविंद्र हटवार महिला प्रदेशाध्यक्ष सौ सिमा खंबलवार प्रदेश प्रवक्ता रमेश लांजेवार मराठवाडा अध्यक्ष संजय हिवाळे विदर्भअध्यक्ष संजय हटवार विभागीय अध्यक्ष गणेश करूटले गणेश नाईक जिल्हा अध्यक्ष भास्कर झगेकर अनिल टाकर्ड- प्रदिप सा कुरूवाळे सर नितीन मेश्राम यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राज्य सदस्य मनोज मेश्राम किशोर कावरे महेंद्र शेंडे अनिता कैलास सोनवणे ज्ञानेश्वर बच्चेवार भास्कर पननमवाड प्रभाकर जमदाडे श्याम करोडदे प्रदिप गजवार यांनी केले आहे.
