ग्रंथालय क्षेत्रात आनंदाचे वातावरण
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १९ वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्य ग्रंथालय परिषदेची निर्मिती उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक माराग्र-२०२५/प्र. क्र .२८/ई -१०९३६०१/ग्रं.क . मंत्रालय मुंबई ३२ दिनांक -२५ सप्टेंबर २०२५ नुसार प्रस्थापना परिषदेमध्ये केली आहे या परिषदेमध्ये अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथ मित्र प्रभाकरराव घुगे यांची निवड झालेली आहे . प्रभाकरराव घुगे यांचे ग्रंथालय क्षेत्रात फार मोठे योगदान असून त्यांच्या निवडी मुळे अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम या पाचही जिल्ह्यामध्ये ग्रंथालय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या निवडीबद्दल अमरावती ग्रंथालय संघांचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा ग्रंथमित्र सुधाकर डोंगरे यांनी अभिनंदन केले असून अनेक ग्रंथालय कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अभिनंदननाचा वर्षाव केला आहे गेल्या ३५ वर्षांपासून ग्रंथालय क्षेत्रात त्यांचे कार्य सतत सुरू असून अमरावती विभागामध्ये सार्वजनिक ग्रंथालय विकासाच्या विविध प्रकारच्या योजना राबविणे, ग्रंथालयांना मार्गदर्शन करणे, नवीन ग्रंथालयांना शासन मान्यता मिळविणे करीता प्रयत्न करणे, ग्रंथालयांचा दर्जा बदल करणे बाबत विविध प्रकारचे शिबिराचे आयोजन करणे त्याच प्रमाणे ग्रंथालयांना साधनसामग्री पुरवठा करणे, ग्रंथपालन प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये काळानुरुप सुधारणा करणे प्रशिक्षणाचा कालावधी वाढविणे या करिता महत्वाची भूमिका बजावली आहे त्याच प्रमाणे. सार्वजनिक ग्रंथालयाच्या अभिलेखांमध्ये समानता असावी या करीता सुद्धा पुढाकार घेऊन प्रयत्न केलेले आहेत वेळोवेळी जिल्हास्तरावर , विभाग स्तरावर ग्रंथालय उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करणे , नागपूर मुंबई मंत्रालयावर ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ करणे कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करणे या बाबत मोर्च्याचे वेळोवेळी आयोजन करणे , ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्या करिता जिल्हाधिकारी कार्यालयावर वेळोवेळी धरणे आंदोलन करणे, विविध प्रकारच्या निवेदनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधणे इत्यादी व्यापक कार्याची दखल घेऊन त्यांची शासनाने राज्य ग्रंथालय परिषदेवर त्यांची निवड केली आहे . या परिषदेमध्ये माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, माननीय राज्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग विधानसभेचे दोन सदस्य व व विधान परिषद सदस्य एक असे तीन आमदार उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव , शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि वि भागिय ग्रंथालय संघाचे सहा प्रतिनिधी, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व शासन नामनिर्देशित दोन सदस्य असून सदर परिषदेचे सदस्य सचिव म्हणून माननीय ग्रंथालय संचालक यांचा समावेश असल्यामुळे ग्रंथालयांच्या प्रलंबित समस्या मार्गी लागतील असा अपेक्षा सुद्धा राज्यातील ग्रंथालय कार्यकर्त्यांनी केली आहे ते आपल्या निवडीचे सर्व श्रेय अमरावती विभागातील सर्व जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, विभाग ग्रंथालय संघाचे पदाधिकारी , विभागातील पाचही जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना देत आहेत.
