माहुरगड येथे नवरात्रोत्सवी महाप्रसादाची भव्य तयारी
माहूरगड / संजय घोगरे
पवित्र अश्विन नवरात्रोत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, माहुर यांच्या वतीने यंदाही भाविकांसाठी महाप्रसादाची भव्य सेवा आयोजित करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ मंडळाने तब्बल तीन लाखांहून अधिक भक्तांना महाप्रसाद देण्याचा संकल्प केला असून, या उपक्रमासाठी सेवेकरी कर्मचारी, विश्वस्त मंडळ व असंख्य अन्नदाते निस्वार्थ भावनेने योगदान देत आहेत.

मागील पाच वर्षांपासून सातत्याने ही सेवा सुरू असून, दररोज सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत तसेच यात्रेदरम्यान सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत महाप्रसादाचे वितरण केले जाते आहे. स्वामी भक्तांच्या भावनेतून सुरू झालेली ही परंपरा आज माहूर नगरीचे नावलौकिक वाढविणारी ठरली आहे.या पवित्र सेवेतील

विश्वस्त व सेवेकरी वर्गाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, भाविक भक्त मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ विश्वस्त मंडळ व माहूरवासी यांच्या वतीने सर्व भाविकांना नम्र आवाहन करण्यात आले आहे की, माहुरगड येथे येऊन या पवित्र प्रसादाचा लाभ घ्यावा व नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
