शहरातून निघाली प्रतिमेची भव्य शोभायात्रा
दर्यापूर /रामेश्वर माकोडे
श्री चक्रधर स्वामी अवतार दिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.त्याच प्रमाणे यावर्षी सुद्धा हा अधिक उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता श्रीकृष्ण मंदिर येथून चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेची भव्य शोभा यात्रा निघाली होती या शोभायात्रेमध्ये पालखी डीजे ढोलाच्या दिंड्या सर्व मानभाव पंथीय सहभागी झाले होते शोभायात्रीची सुरुवात श्रीकृष्ण मंदिर येथून आचार्य प्रवर श्री दिगंबर मुनी बाबा अंकुर नेरकर यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन बाबा खुल्या जीपमध्ये बसून शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते ही शोभायात्रा अमरावती रोड वरून डॉक्टर डालके यांच्या हॉस्पिटल समोर आली असता खासदार बळवंत वानखडे यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केले त्याप्रसंगी संस्थेतर्फे त्यांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर खासदार यांनी दिगंबर मुनी बाबा अंकुर नेरकर यांचा सत्कार केला व आशीर्वाद घेतले त्याप्रसंगी त्यावेळेस बाळासाहेब अलोने संचालक अमरावती जिल्हा सहकारी बँक अमरावती उपस्थित होते.

डेपो चौक मार्गे जात असताना सुनील पाटील डिके यांच्या वतीने तिथे सुनील पाटील यांनी पालखीचे पूजन करून उपस्थित सर्वांना चहापान देण्यात आला तसेच डेपो चौकात दर्यापूर भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष सौ मेगा भारती यांनी सुद्धा पालखीचे पूजन करून आशीर्वाद घेतले त्यानंतर पालखी म्हणजे शोभायात्रा महात्मा गांधी पुतळा चौक येथे गेली असता तिथून पुन्हा रेल्वे गेट शिवाजी चौक दर्यापूर नगर परिषद नवीन बिल्डिंग या ठिकाणी शोभायात्रा आली असता त्या परिसराचे कार्यकर्ते श्री रवी भाऊ राजपूत यांनी सह पत्नी पालखीचे पूजन केले व दर्शन घेतले त्याप्रसंगी रवींद्र ढोकणे मदन पाटील बायस कार आधी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर शोभायात्रा पुन्हा अमरावती रोडला येऊन तिचा श्रीकृष्ण मंदिर साईनगर दर्यापूर या ठिकाणी समारोप करण्यात आला त्यानंतर धर्मसभा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त आचार्य प्रवर श्री दिगंबर मुनी बाबा अंकुशनेरकर यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर महाप्रसाद प्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता दर्यापूर तालुका महानुभाव युवा कार्यकर्ते व श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी विश्वस्त यांनी विशेष परिश्रम घेतले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज अवतार दिन मोठ्या उत्साहात वाजत गाजत साजरा करण्यात आला.

What i do not understood is in truth how you are not actually a lot more smartlyliked than you may be now You are very intelligent You realize therefore significantly in the case of this topic produced me individually imagine it from numerous numerous angles Its like men and women dont seem to be fascinated until it is one thing to do with Woman gaga Your own stuffs nice All the time care for it up