
लोकसहभागातून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खडेश्वर तालुक्यातील धानोरा फसी ग्रामपंचायत अंतर्गत कोव्हळा फाटा ते टाकळी कानडा या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने तसेच दुतर्फा काटेरी झुडूपे वाढली असल्याने गावकऱ्यांना वाहतूक करतांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. याची दखल घेऊन गावकऱ्यांनी लोक सहभागातून वर्गणी जमा करुन जेसीबी ने काटेरी झुडपे तसेच खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.
टाकळी कानडा गावाला जाण्यासाठी दोन रस्ते असुन एक रस्ता पिंपळगाव बैणाई मार्गावररुन तर दुसरा रस्ता कोव्हळा फाट्यावरुन गावाला जातो, या रस्त्याने टाकळी कानडा टाकळी गिलबा अशा दोन तीन गावाचे शेतकरी शेतमजूर कर्मचारी वर्ग विद्यार्थी रहदारी करतात हा रस्ता ब-याच दिवसांपासून काटेरी झुडुपांनी वेडला तसेच रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले प्रशासनाच्या लालपितशाही मुळे काम करण्याचा धाडसी निर्णय गावकऱ्यांनी घेतला रस्त्याचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली त्यामुळे गावकऱ्यांना आता पावसाळ्यात या रस्त्यावर चालण्यासाठी काही प्रमाणात सुविधा निर्माण होईल .हा आदर्श गावकऱ्यांनी घेतला असून पंचक्रोशीतील याचे कौतुक होत आहे.रस्त्यावर खड्ड्यात मुरुम टाकून तसेच दुतर्फा वाढलेली झुडूप काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होऊन गावकरी स्वता सहभाग घेऊन हे काम करीत आहे.